India news | 18 ते 19 सप्टेंबर डॉक्टरांचा 24 तासांचा संप : रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्यसेवेत ठाम भूमिका

अहमदनगर | १७ सप्टेंबर | रयत समाचार

(India news) राज्य शासनाने होमिओपॅथी सीसीएमपींना आधुनिक वैद्यक (ॲलोपॅथी) उपचार करण्यास परवाना दिल्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) अहिल्यानगर शाखेने आंदोलनाची हाक दिली आहे. यानुसार १८ सप्टेंबर गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून ते १९ सप्टेंबर शुक्रवार सकाळी ८ वाजेपर्यंत डॉक्टरांचा २४ तासांचा संप होणार आहे.

(India news) अधिक माहिती देताना आयएमए नगर शाखेचे सचिव डॉ. मुकुंद तांदळे यांनी सांगितले, हा संप आमच्या वैयक्तिक अथवा व्यावसायिक फायद्यासाठी नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आहे. ॲलोपॅथीचे अल्प प्रशिक्षण घेऊन कोणालाही आधुनिक पद्धतीने उपचार करण्याचा अधिकार देणे हे धोकादायक आहे.

(India news) डॉ. तांदळे यांनी स्पष्ट केले की, हा संघर्ष जनतेच्या जीवितरक्षणासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित आरोग्यसेवा मिळावी यासाठी आहे. या संपामुळे नागरिकांना थोड्याफार गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. मात्र, आयएमएने जनतेला आवाहन केले आहे की त्यांनी या आंदोलनाला नैतिक पाठिंबा द्यावा.

आयएमए नगर शाखेच्या या भूमिकेमुळे वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, शासनाने घेतलेल्या निर्णयावर डॉक्टरांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Share This Article