अहमदनगर | ११ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(india news) शहरातील स्टेशनरोडवरील क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल येथे उद्या ता.१२ फेब्रुवारी रोजी पाहिले ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन होत आहे. आजपर्यंत विविध मोठ्या शहरात साहित्य संमेलने झाली, होत आहेत. मात्र ग्रामीण भागातील ख्रिस्ती साहित्यिकांसाठी स्वतंत्र असे संमेलन कधीही झाले नाही. साहित्याचा उगमच मुळी ग्रामीण भागात झाला, असे म्हणे चूक होणार नाही. मात्र आपली वाङ्मयाची भूक भागवण्यासाठी ग्रामीण साहित्यिकाला स्वतंत्र विचारपीठ नव्हते. या साहित्य संमेलनामुळे ते उपलब्ध होणार आहे, असे संमेलनाचे आयोजक साप्ताहिक उपदेशकचे संस्थापक विक्रम गायकवाड यांनी सांगितले.
(india news) आताची क्लेरा ब्रुस हायस्कूल म्हणजे ऐतिहासिक अमेरिकन मराठी मिशनरी सिंथिया फॅरार यांची शाळा. याशाळेत सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी शिक्षिकेचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. तत्कालिन अहमदनगरच्या कोर्टात कार्यरत असलेले विनायक गोवंडे हे महात्मा फुलेंचे मित्र होते. त्यांनी सिंथिया फॅरार यांच्या शाळेची माहिती फुलेंना दिली होती. मग फुले यांनी ही शाळा पाहून सावित्रीबाई आणि फातिमा यांनी येथे काही दिवस प्रशिक्षणासाठी ठेवले होते, असा इतिहास इतिहासप्रेमी सांगतात. या पवित्र भुमित साहित्यसंमेलन होत आहे, ही महत्वाची बाब आहे.
(india news) संमेलनाला मराठी ख्रिस्ती परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पौलस वाघमारे, परिषदेचे खजिनदार ॲड. विनायक पंडीत, जुन्यानव्या पिढीला जोडणारे ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे, फादर ज्यो. गायकवाड (मा. संपादक निरोप्या), देवदान कळकुंबे (प्रशासक, बुथ हाॅस्पिटल), डाॅ. रवी प्रभाकर (मराठी मिशन), पा. सुनील गंगावणे (विनियार्ड ब्लेसेड चर्च), अनिल भोसले (अध्यक्ष, ख्रिस्ती विकास परिषद), कांतीश तेलोरे (कार्यकारी संपादक, ज्ञानोदय) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
हे ही वाचा : दैनिक रयत समाचारचा ‘ख्रिसमस विशेषांक’ 2024 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(india news) संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डाॅ. विजया जाधव, संमेलन अध्यक्ष जाॅर्ज क्षेत्रे, तर संमेलनाचे उद्घाटक एस.के आल्हाट (मराठी मिशन), व साहित्यिक व कवी सायमन मार्टीन हे असणार आहेत तर स्वागत समितीत अनुराधा शिरसाठ, सॉलोमन गायकवाड, सतिष मिसाळ, जयमाला केदारी, प्रकाश लोखंडे, प्रशांत गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, राजु दादा देठे, सुरेश भिंगारदिवे, अशोक गायकवाड, शिरीष लाड, अमोल लोंढे, प्रविण साबळे, सी.आर. कांबळे, ॲड. रोहम आरसुड, रेव्ह. दिपक पाडळे, किरण चांदेकर, लुकस पाटोळे, मोनालिसा गुजे, संदेश सुर्यवंशी, संगिता पारले, निर्मला केदारे, किरण चांदेकर (अहमदनगर), श्रीधर भोसले, सुशील साठे, सुशील क्षत्रीय आदी आहेत.
सकाळी ग्रंथ दिंडीपासून कार्यक्रमाला सुरुवात होईल. सायंकाळी साहित्यिकांच्या सत्काराने कार्यक्रमाची सांगता होईल. साहित्य रसिकांनी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साहित्य संमेलन हे पहिलेच वर्ष असल्यामुळे एकदिवसीय होणार असल्याचे आयोजक विक्रम गायकवाड यांनी सांगितले तर अधिक माहितीसाठी ८००७८३६१७४, ९८२२५१०९२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
हे ही वाचा : Social | नैतिकता : समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक – संजय सोनवणी