Cristmas 2024: दैनिक रयत समाचारचा 'ख्रिसमस विशेषांक' 2024 प्रसिद्ध झाला - Rayat Samachar

Cristmas 2024: दैनिक रयत समाचारचा ‘ख्रिसमस विशेषांक’ 2024 प्रसिद्ध झाला

सामाजिक समतेच्या कार्यात वाचकांनी सहभागी होण्याचे आवाहन

रयत समाचार वृत्तसेवा
https://epaper.rayatsamachar.com/edition/217/rayat-samachar

‘ख्रिसमस विशेषांक’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर | २५ डिसेंबर | प्रतिनिधी

(Cristmas 2024) ख्रिस्तजन्म सोहळा असलेला ख्रिसमस जगभरातील प्रेम, शांती, सहकार्य आणि आनंदाचा सण. या आनंदात सर्व भारतीय ‘माणसांनी’ सहभागी व्हावे. ‘माणूस’ म्हणून एकमेकांसोबत सहजीवनाने रहावे. एकमेका सहाय्य करावे, यासाठी टीम रयत समाचार ‘ख्रिसमस विशेषांक‘ प्रसिद्ध करत आहे. सर्व भारतीय माणसांना एकमेकांची संस्कृती समजावी, त्यांनी एकमेकांशी प्रेमाने रहावे. देशभरातील सर्वधर्मिय ‘माणसे’ एक आहेत, यातच आपल्या देशातील माणसांचे भले आहे, हा दृष्टीकोण रयत समाचारचा आहे.

 (Cristmas 2024) आम्ही आज जे काही वाचू शकतो, लिहू शकतो त्यासाठी अमेरिकन मराठी मिशनचे जन्मजन्मांतरीचे आभार. आमचे पुर्वज केरू पाराजी वाकळे हे आमच्या कुटुंबातील पहिले शिक्षित. ते जुनी दुसरी शिकले, त्यांना अक्षर ओळख झाली. त्यांचा शाळेचा दाखला मिशन स्कूलचा आहे, तिला ‘साळवे मास्तरची शाळा’ असेही जुने नाव होते. त्यांच्या आधी आमचे कोणतेच पुर्वज शाळा शिकले नव्हते, कारण आम्हा शुद्र कुणब्यांना शिक्षणबंदी होती. आमच्या आताच्या पिढीतील आणि पुढच्या पिढीतील सर्वजणांनी शिक्षण घेतले. त्यापैकी काहीजण उच्चशिक्षित आहेत. मुलीतर डॉक्टर, तलाठी, इंटेरियर डिझाईनर तर काही मुले थेट विमानउड्डाण क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्वाचे श्रेय जाते अमेरिकन मराठी मिशन या संस्थेस. आमच्या आज्ज्याला जर त्यांनी शिक्षणच दिले नसते तर आमच्या पिढ्या आज आडाणीपणाने शेतात राबराबून मेल्या असत्या, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. टीम रयत समाचार या सर्व गोष्टींची जान ठेवून उत्तम, खरी, सत्य माहिती देत सामाजिक समतेचा, मानवीहक्क आणि मानवी मुल्यांचा दृष्टीकोन ठेवत हा विशेषांक प्रसिद्ध करत आहे.

Cristmas 2024
Credit : https://shashidubey.medium.com/the-bliss-of-christmas-784bb6570144
जसजसा ख्रिसमसजवळ येतो तसतसे सांताक्लॉज व नाताळाविषयी गैरसमज निर्माण करणारे मेसेज काही ‘देशविरोधी’ ‘देशद्रोही’ लोकांकडून समाजमाध्यमांमधे पसरवले जातात. त्याला सामान्य लोक बळी पडतात. कोणतीही खातरजमा अथवा खरेखोटे न तपासता ते पुढे व्हायरल केले जातात आणि भारताच्या सामाजिक समतेस खिळ बसविण्याचे काम हे देशद्रोही करत असतात. यावर एकच उपाय तो म्हणजे देशहिताचा दृष्टिकोन समोर ठेवून सत्य लिहीत राहणे.
 या अंकामधे ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे, ज्येष्ठ संपादक सॉलोमन गायकवाड, निवृत्त प्राचार्य मानद वन्यजीव रक्षक तथा निसर्ग अभ्यासक प्रा.डॉ.सुधाकर कुऱ्हाडे, रेव्हरंड जे.आर.वाघमारे, अहमदनगर कॉलेजच्या अध्यापिका डॉ.निमिषा बंडेलु, वृत्तपत्रविद्या शिक्षक सॅम्युअल वाघमारे, गोव्याच्या लेखिका सुवर्णा गावकर, इतिहास अभ्यासक विजय शशिकांत मिसाळ, नवलेखिका रसिका लायल चावला यांचे अभ्यासपूर्ण लेख आहेत.
Cristmas 2024
CAROL GROUP of Bishop Lloyd Colony, Ahmednagar. विहान गायकवाड, जेसन ओहोळ, प्रिशा बोठे, अनाईशा बोठे, विहाना गायकवाड, सोम मिरपगार
  सध्याच्या द्वेषाच्या हुकूमशाही काळात अभ्यासपूर्ण मांडणी करून एकमेकांना प्रेम देत भारतीय संविधानाला अपेक्षित सामाजिक समता आणि एकजूटीसाठी ख्रिसमस विशेषांकातील लेखांचा हातभार लागणार आहे. हाच उद्देश या अंकाचा आहे, असे टीम रयत समाचार मानते. या अंकाच्या परिपुर्णतेसाठी बाळासाहेब नागूल, संतोष गायकवाड, विजय केदारे, आबिदखान, पंकज गुंदेचा, तुषार सोनवणे, अतुल देठे, दत्ताभाऊ वडवणीकर, मरयम सय्यद, एस्थर ऱ्होलुपुई, असिफखान दुलेखान, कलासंपादक सय्यद समी या सर्वांचा हातभार लागला आहे. वाचक या अंकाचे स्वागत करतील ही आशा.

– भैरवनाथ वाकळे, संपादक.

दिपक शिरसाठ, उपसंपादक.

प्रभाकर ढगे, समुह संपादक, गोवा.

श्रीकांत काकतीकर, निवासी संपादक, बेळगाव, कर्नाटक.

आपल्याला ‘ख्रिसमस विशेषांक‘ पाहिजे असल्यास रयत समाचारच्या 8805401800 या क्रमांकावर व्हॉटसअप करावे.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
1 Comment