History | छत्रपती संभाजींचा ‘छावा’ पहाण्यापूर्वी प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजित सावंत यांची ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी घेतलेली 1 मुलाखत नक्की पहा

उपसंपादक | दिपक शिरसाठ

कोल्हापूर | २३ फेब्रुवारी | प्रतिनिधी

(History) येथील प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजित सावंत यांची ज्येष्ठ पत्रकार, संपादक विजय चोरमारे यांनी नुकतीच ‘छावा’ या चित्रपटाविषयी मुलाखत घेतली. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे महाराष्ट्रासह जगाला आकर्षक आहे. तरूणाईला या राजाची भुरळ पडलेली आहे. त्यांच्या इतिहासाचा अनेकदा गैरवापर केला गेला. चुकीची बदनामीकारक माहिती इतिहास या नावाखाली अनेक नाटककार, कादंबरीकार यांनी प्रसारीत केली, त्यावर चुकीचे चित्रपट निर्माण केले गेले.  त्यामुळे अनेक पिढ्यांपुढे संभाजी महाराजांची चुकीची प्रतिमा उभी होती. कमल गोखले, जयसिंगराव पवार, वा.सि.बेंद्रे अशा अनेक इतिहासकारांनी सत्य इतिहास समोर आणून पराक्रमी स्वातंत्र्यवीर संभाजी महाराजांचा सत्य इतिहास जगासमोर आणला.

(History) आपण कादंबरी, चित्रपट, नाटक यालाच खरा इतिहीस मानतो हि घोडचूक असते. कादंबरी, नाटक, चित्रपट यामध्ये ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ नावाखाली घालघुसड केलेली असते. ते ऐतिहासिक तथ्य नसते. हि बाब सर्वसामान्यांनी ध्यानात ठेवली पहिजे.

(History) नुकताच संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर छावा नावाचा हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटाचा अनेक छोट्याबुध्दीचे राजकीय लोक मुस्लिमविरोध म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. याचा सामाजिक विद्वेषासाठी वापर करताना दिसत आहेत, मुळात हेच लोक छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय करत आहेत. छत्रपती संभाजींचा खरा इतिहास दडवून आपला राजकीय अजेंडा पंटरांच्या माथी मारत आहेत, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे.
छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आपण नक्की पहा. हा चित्रपट पहायला जाण्यापूर्वी प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजित सावंत यांची ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक विजय चोरमारे यांनी घेतलेली सविस्तर मुलाखत ऐकूण छत्रपती संभाजींचा ‘छावा’ पहाण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.
मुलाखत पहाण्यासाठी येथे क्लिक करा – https://youtu.be/XsbQ29bHuXI?si=ckIqWYU6jRooSmUQ

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘ईसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *