History | आपला स्वाभिमान साताऱ्याचं प्रतिसरकार; संपत मोरे यांचे 12 ऑक्टोबरला व्याख्यान ; क्रांतिसिंह नाना पाटील शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम

History | आपला स्वाभिमान साताऱ्याचं प्रतिसरकार; संपत मोरे यांचे 12 ऑक्टोबरला व्याख्यान ; क्रांतिसिंह नाना पाटील शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम

सातारा | ०९.१० | रयत समाचार

(History) क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आणि येत्या १५व्या विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलनाच्या पूर्वसंध्येला विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार तथा प्रतिसरकार चळवळीचे अभ्यासक संपत मोरे असणार आहेत. ते ‘आपला स्वाभिमान साताऱ्याचं प्रतिसरकार’ या विषयावर विचार मांडणार आहेत. साताऱ्याच्या भूमीतील स्वातंत्र्यलढ्यातील बंडखोर परंपरा आणि आजच्या काळातील सामाजिक स्वाभिमानाच्या लढ्यांशी जोडणारा हा संवाद उपस्थितांना विचारप्रवृत्त करणारा ठरला.

(History) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे महाराज (ज्येष्ठ कीर्तनकार), तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुसूदन मोहिते (चेअरमन गाडगे महाराज मिशन) उपस्थित असतील. यावेळी क्रांतिवीर जिजाबा मोहिते महाराज यांच्या कन्या विजया बाजीराव जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात येईल.  व्याख्यानास ॲड. सयाजीराव पाटील, ॲड. सूर्यकांत जराड, प्राचार्य सतीश घाटगे यांसारख्या मान्यवरांसह अनेक विद्रोही कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार.

(History) कार्यक्रमाचे ठिकाण दैवज्ञ समाज भवन, यादोगोपाळपेठ, सातारा, महाराष्ट्र तर ता. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ. विजय माने, कॉ. विजय मांडके, डॉ. शामिका गुरव, प्रा. अनिता माळी, कॉ. जयवंतराव खराडे, गिरीश बनकर, प्रा.डॉ. मनिषा शिरोडकर, ॲड. रणजीत भोसले, ॲड. राजेंद्र गलांडे, राहुल गंगावणे, शिवराम ठवरे, आयु. अभिजीत भालेराव तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळ सातारा जिल्ह्याच्या टीमने केले.
साताऱ्याची विद्रोही परंपरा, क्रांतीची स्मृती आणि नव्या समाजनिर्मितीचा संकल्प या तीन सूत्रांवर आधारित हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरणार.

 

इतिहास छत्रपती महाराष्ट्र सांस्कृतिक राजकारण साहित्य