ठाणे | तुषार सोनवणे
मुंबईसह उपनगरात मागील काही दिवसांपासून HeavyRain मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातही कल्याण, अंबरनाथ, बदलापूर याठिकाणी पाऊसाचा जोर जास्त प्रमाणात आहे. यामुळे नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. ‘रायता’ नदीला मोठा पूर आला असून अहमदनगर-कल्याण रोडवर असलेल्या पुलावरून पाणी जात आहे. अहमदनगरला जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबचलांब रांगा लागलेल्या आहेत. प्रशासनाने नदीचे पाणी कमी होईपर्यंत पुलावरून वाहतूक करू नये, असे आवाहन केले आहे.
(रायता नदीचा पूर)
हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ठाणे शिक्षण विभागाने शाळेला जाहीर केेल्या आहेत.
हे हि वाचा :
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.