अहमदनगर | २८.३ | रयत समाचार
(Health) गत ५ वर्षांच्या आरोग्यसेवेनंतर नवे पर्व सुरू करत असलेल्या ‘अत्रेयी आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर’चे भव्य उद्घाटन रविवारी ता. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. पारंपरिक आयुर्वेद आणि आधुनिक सुविधांचा संगम असलेल्या या केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती डॉ. मधुरा आणि डॉ. अक्षय वैद्य यांनी दिली.
(Health) ‘पंचवट आयुर्वेद क्लिनिक’च्या यशस्वी प्रवासानंतर आता अधिक आधुनिक स्वरूपात ‘अत्रेयी आयुर्वेद’ या नावाने नवीन वास्तूमध्ये सेवा सुरू होत आहे. आयुर्वेदातील पंचकर्म उपचार, रोगनिवारण व आरोग्य संवर्धनासाठी अत्याधुनिक पद्धतींचा वापर येथे केला जाणार आहे.
(Health) उद्घाटन समारंभासाठी आ. संग्राम जगताप तसेच पुण्याचे डॉ. सर्वेश कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. सावेडी, अहिल्यानगर येथील निसर्गनगर परिसरात, डॉ. आंबेडकर भवन ते कराळे जिम रस्त्यावर हे नवीन क्लिनिक सुरू होत असून, स्थानिक नागरिकांसाठी ही आरोग्यसेवेची मोठी संधी मानली जात आहे.
डॉ. मधुरा वैद्य-ढगे आणि डॉ. अक्षय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणारे हे केंद्र आयुर्वेद क्षेत्रात विश्वासार्ह आणि प्रभावी उपचार देण्याचा संकल्प घेऊन येत आहे.
याप्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहून नव्या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रविंद्र वैद्य आणि परिवाराकडून करण्यात आले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
