Crime | सावध, चौकस, विवेकी राहा- लेखिका वीणा गवाणकर; ‘भोंदूभटजी’ प्रकरणावर सतर्क भूमिका; पोलिसांना दिली माहिती

दिवाळी अंक प्रकाशनावेळी भोंदूवैद्यची उपस्थिती

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २८.३ | रयत समाचार

(Crime) वसई येथे समोर आलेल्या कथित भोंदभटजी ‘धर्मगुरु’ ऋषिकेश वैद्य प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली असताना, जगप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आणली. गवाणकर यांनी सांगितले की, एका दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी संबंधित व्यक्ती संपादकासोबत त्यांच्या घरी आगंतुक म्हणून आली होती. त्या वेळी तो ‘धर्मगुरु’ म्हणून उपस्थित होता.

(Crime) दरम्यान, संबंधित व्यक्तीविरोधातील गंभीर बातमी समोर आल्यानंतर त्यांनी तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती दिली आहे. तसेच, त्या प्रसंगाचे फोटो त्यांच्याकडे असून ते ‘सदाचारी वर्तनाचा पुरावा’ म्हणून सादर करता येतील, म्हणून खबरदारी म्हणून जतन करून ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(Crime) या घटनेच्या पार्श्वभूमीवर गवाणकर यांनी समाजाला सावधतेचा इशारा देत म्हटले आहे की, सावध, चौकस आणि विवेकी राहणे अत्यंत आवश्यक आहे.
ऋषिकेश वैद्य याच्यावर ‘मी महादेवाचा अवतार आहे’ असे सांगून एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. या धक्कादायक घटनेनंतर समाजातील भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेविरोधात पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे.
या प्रकरणामुळे समाजात जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित झाली असून, कोणत्याही व्यक्तीच्या आड धार्मिक मुखवटा असला तरी सत्य पडताळणे आणि विवेकाने निर्णय घेणे गरजेचे असल्याचा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading