Health | आपले स्वप्न पूर्ण करा, संधीवाताला हरवा; 12 ऑक्टोबर जागतिक संधिवात दिन

Health | आपले स्वप्न पूर्ण करा, संधीवाताला हरवा; 12 ऑक्टोबर जागतिक संधिवात दिन

आरोग्यवार्ता | १२.१० | डॉ.श्याम गणविर

देशभरात आर्थायटिसच्या (Arthritis) रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आता हा आकडा सुमारे १८ कोटी इतका झाला आहे. त्यापैकी १५ कोटी लोकांना गुडघेदुखीचा त्रास होत आहे. आर्थायटिस या आजारात शरीरातील हाडे (bones) कमकुवत होतात. त्यामुळे लोकांना सांध्यांमध्ये वेदना, सूज येणे किंवा ते आखडणे असा त्रास सहन करावा लागतो.

आज १२ ऑक्टोबर जागतिक आर्थायटिस दिवस (World Arthritis Day) २०२२ च्या पार्श्वभूमीवर, हा आजार नक्की काय आहे व त्यामुळे काय नुकसान होऊ शकते, हे जाणून घेऊया.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आर्थायटिस या आजारात हाडांव्यतिरिक्त शरीराच्या इतर १४ अवयवांना हानी पोहोचवते. तसेच हाडांमध्ये ऑस्टिओपोरोसिस, स्मायूंमध्ये अशक्तपणा, पेशींचे नुकसान होणे, डोळ्यांमध्ये कोरडेपणा व लालसरपणा जाणवणे, रक्ताची कमतरता, न्यूमोनिया, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे, आता आर्थायटिसचा त्रास हा तरुणांमध्येही सामान्य झाला असून ३० ते ४० या वयोगटातील लोकांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.

का होतो सांधेदुखीचा त्रास ? तर
उठण्याची आणि बसण्याची चुकीची पद्धत, हे सांधेदुखीचे सर्वात मोठे कारण आहे, असे डॉ. अखिलेश यांनी नमूद केले. सांधेदुखी टाळायची असेल तर पाय वाकवून बसणे टाळा. कधीही जिममध्ये किंवा इतरत्र एकदम भारी वर्कआउट करू नका. तसेच आहाराची योग्य काळजी घ्या आणि ज्यामध्ये कॅल्शिअम असेल अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. तसेच धूम्रपान करणे टाळावे, ते आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते.

कम्युनिटी फिजिओथेरपीमध्ये संधिवाताच्या रुग्णांसाठी वेदना कमी करणे, सांध्यांची लवचिकता वाढवणे, स्मायू मजबूत करणे आणि दैनंदिन कामे करण्यासाठी मार्गदर्शन करणे अशा अनेक महत्त्वाच्या भूमिका असतात. फिजिओथेरपीमुळे रुग्णांना त्यांच्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण मिळवून जीवनमान सुधारता येते.

कम्युनिटी फिजिओथेरपीची भूमिका : दैनंदिन हालचालींसाठी प्रशिक्षण : फिजिओथेरपिस्ट् रुग्णांना चालणे, उठणे, बसणे आणि दैनंदिन कामे योग्य पद्धतीने कशी करावीत हे शिकवतात. यामुळे सांध्यांवरील ताण कमी होतो आणि वेदना टाळता येतात.

सांध्यांची लवचिकता टिकवणे : संधिवातामुळे सांधे आखडतात. कम्युनिटी फिजिओथेरपीमध्ये दिले जाणारे लवचिकतेचे व्यायाम सांध्यांची हालचाल कायम ठेवण्यास मदत करतात.

स्नायूंची ताकद वाढवणे : संधिवातामुळे कमकुवत झालेल्या सांध्यांभोवतीच्या स्मायूंना मजबूत करण्यासाठी विशिष्ट व्यायामांचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे सांध्यांना आधार मिळतो.

घरगुती उपचारांसाठी मार्गदर्शन : बर्फ लावणे (क्रायोथेरपी), गरम शेक देणे आणि योग्य मालिश कशी करावी, याबद्दल मार्गदर्शन केले जाते. यामुळे वेदना आणि सूज कमी होते.

जीवनशैलीत बदल : फिजिओथेरपी उपचार म्हणून केवळ व्यायामावर अवलंबून नसते, तर आहारात बदल आणि वजन नियंत्रणासारख्या गोष्टींवरही लक्ष केंद्रित केले जाते, जे संधिवाताच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे आहे.

मानसिक आणि भावनिक आधार : दीर्घकाळ चालणाऱ्या आजारामुळे येणाऱ्या मानसिक ताणाला सामोरे जाण्यासाठी फिजिओथेरपिस् आधार देतात. रुग्णांना जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्यास मदत केली जाते.
सामुदायिक फिजिओथेरपी संधिवात असलेल्या रुग्णांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मजबूत आधार संधिवातासारख्या आजारामुळे दररोज वेदना, थकवा आणि हालचालींमध्ये अडथळे येतात. पण योग्य उपचाराने,
संधिवात असलेले रुग्ण त्यांचे लक्ष्य गाठू शकतात, स्वावलंबी होऊ शकतात आणि आपले स्वप्न पूर्ण करू शकतात.

हालचाल सुधारणा आणि स्वावलंबन : रुग्णांचे अनेक स्वप्न हे त्यांच्या मूलभूत हालचाली सुधारण्याशी संबंधित असतात जसे की चालणे, काम करणे, बागकाम करणे इत्यादी. वैयक्तिक व्यायामाने स्मायूंची ताकद, लवचिकता आणि समतोल वाढतो. फिजिओथेरपिस्ट घरातील घातक गोष्टी ओळखून त्यावर उपाय सुचवतो. वॉकर, काठी किंवा इतर सहाय्यक उपकरणे कशी वापरायची हे शिकवतो, जे रुग्णाला अधिक स्वावलंबी बनवते.

वेदना आणि लक्षणे नियंत्रणात ठेवणे : वेदना ही संधिवात असलेल्या रुग्णांसाठी सर्वात मोठी अडचण असते. फिजिओथेरपीमध्ये वेदनांवर उपाय करण्यासाठी अनेक औषधांशिवाय उपाय वापरले जातात. थंडी-उष्णतेचा उपयोग, मालिश, TENS मशीन, यांसारख्या उपचार पद्धती वापरल्या जातात. फिजिओथेरपीमुळे औषधांवरील अवलंबित्व कमी होते, ज्यामुळे साइड इफेक्ट्स कमी होतात.

सामुदायिक फिजिओथेरपिस्ट् काय करतो? तर सामुदायिक फिजिओथेरपिस्ट रुग्णाच्या गरजेनुसार उपचार ठरवतो आणि अनेक प्रकारचे आधुनिक व पारंपरिक उपाय वापरतो. पूर्ण शरीर मूल्यांकन हालचाली, ताकद, समतोल, पोश्चर, आणि दैनंदिन कामे किती सहज करता
येतात हे पाहणे. व्यक्तिनुसार व्यायाम चालणे, सायकलिंग, स्स्रायू ताकद वाढवणे, स्ट्रेचिंग, समतोल वाढवणारे .

मॅन्युअल थेरपी : सांध्यांची हालचाल सुधारण्यासाठी हाताने केलेले उपचार. हायड्रोथेरपी पाण्यात केलेले व्यायाम जे सांध्यांवर ताण न आणता होतात.
मानसिक व भावनिक स्वास्थ्यासाठी उपाय योगा करा.
या वर्षीची थीम आहे, Achieve Your Dreams म्हणजेच, आपले स्वप्न पूर्ण करा. संधिवात असलेले अनेक रुग्ण खालील गोष्टींचे स्वप्न पाहतात, पुन्हा कामावर जाणे.
प्रवास करणे. आवडती छंदे जोपासणे. कोणावर अवलंबून न राहता जीवन जगणे. इतरांना मदत करणे. स्वप्न कुठलेही असो ते महत्वाचे आहेत आणि शक्य आहेत. सामुदायिक फिजिओथेरपी या प्रवासात त्यांचा आधार बनते. रुग्ण, फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर आणि समाज एकत्र आल्यास, आपण एक असे भविष्य घडवू शकतो जिथे संधिवात असलेले रुग्ण फक्त उपचार घेत नाहीत, तर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. जागतिक संधिवात दिन २०२५ च्या निमित्ताने, चला सामुदायिक फिजिओथेरपीच्या महत्त्वाची जाणीव करून देऊ आणि प्रत्येकाला त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचायला मदत करूया.

Health
डॉ.श्याम गणविर

(लेखक मेंबर ऑफ नॅशनल कमिशन ऑफ लाईट अँड हेल्थकेअर प्रोफेशन व
प्राचार्य डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, विळद, अहमदनगर येथे कार्यरत आहेत)

ताज्या बातम्या