गोवा | ९ मे | प्रतिनिधी
(Goa news) येथील सिओलिममधील राजेश धारगलकर या शेतकऱ्याने दुर्मिळ असलेल्या मियाझाकी आंब्याच्या जातीच्या फळाचे यशस्वीरित्या उत्पादन घेत इतिहास रचला. या आंब्याला तैयो नो तामागो किंवा ‘सूर्याचे अंडे’ असे नाव आहे. ही प्रीमियम जपानी जात त्याच्या उच्च अँटिऑक्सिडंट’साठी सुप्रसिद्ध आहे. ही सामान्यतः उष्ण हवामानात पिकवली जाते. विशेष म्हणजे हे झाड तीन वर्षांनी फळ देते.
(Goa news) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धारगलकर यांच्या खास प्रयत्नांचे कौतुक केले. अशा प्रयोगांमुळे राज्यातील बागायती क्षेत्राला चालना देणाऱ्या अधिक कृषी नवकल्पनांना प्रोत्साहन मिळते, असे सावंत म्हणाले.

हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
