Film festival | ‘स्पार्क फिल्म फेस्टिव्हल २०२५’ पर्यावरण विषयी राज्यस्तरीय लघुपट स्पर्धेत सहभागी व्हा; शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरतर्फे आयोजन

उपसंपादक | दिपक शिरसाठ

कोल्हापूर | ०६.११ | रयत समाचार

(Film festival) शिवाजी विद्यापीठ मास कम्युनिकेशन विभाग, लक्ष्मी फाऊंडेशन आणि किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्पार्क फिल्म फेस्टिव्हल २०२५’ या राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट/माहितीपट स्पर्धेला तरुण चित्रपट निर्मात्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास, प्रदूषण नियंत्रण आणि जैवविविधता यांसारख्या विषयांवर प्रभावी संदेश देणारे लघुपट या स्पर्धेसाठी मागविण्यात आले आहेत.

(Film festival) स्पर्धेसाठी २० मिनिटे कालावधीचा (क्रेडिट्ससह) लघुपट HD/MP4 स्वरूपात सादर करणे आवश्यक असून, सिनॉप्सिस, टीम डिटेल्स आणि घोषणा पत्र (Declaration) जोडणे बंधनकारक आहे. मराठी व्यतिरिक्त सर्व चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स अनिवार्य आहेत.

(Film festival) स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹१५,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹१०,००० तर तृतीय क्रमांकासाठी ₹७,००० पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विजेत्या लघुपटाचे किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कोल्हापूर येथे विशेष प्रदर्शन होणार आहे, ही तरुण दिग्दर्शकांसाठी मोठी संधी ठरणार आहे.

लघुपट सादर करण्याची अंतिम तारीख २५ डिसेंबर २०२५ असून महोत्सव ता. २ व ३ जानेवारी २०२६ दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात पार पडणार आहे.

स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र विद्यापीठामार्फत देण्यात येणार असून अधिक माहितीसाठी [email protected] आणि 7829396051 / 8805990418 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाने कळविले आहे.

Share This Article