Social | ​शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी माहिती केंद्र सुरू; पीस फाउंडेशनचा पुढाकार

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ३१.३ | रयत समाचार

​(Social) शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, तसेच गरजू व्यक्तींना योग्य मार्गदर्शन व मदत मिळावी या उद्देशाने पीस फाउंडेशनच्या वतीने मुकुंदनगर येथे माहिती केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक शेख अब्दुल कादीर यांच्या हस्ते करण्यात आले.

Social

​(Social) या उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक शम्स खान आणि खालीद शेख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

​(Social) कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अर्शद शेख यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजनांची माहिती योग्य पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचत नसल्यामुळे अनेक पात्र लाभार्थी वंचित राहतात. ही समस्या लक्षात घेऊनच या माहिती केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्राद्वारे शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणे, अर्ज प्रक्रिया समजावून सांगणे आणि आवश्यक तेथे पाठपुरावा करणे अशी सेवा दिली जाणार आहे. तसेच एसआयआर संदर्भातील माहितीही येथे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
​पीस फाउंडेशनने अशा प्रकारचे अनेक माहिती केंद्र महाराष्ट्रातील विविध शहरे व उपनगरमध्ये सुरू केले असून, या उपक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांचे स्वागत पीस फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष ॲड. नदीम सय्यद यांनी केले.
​शेख अब्दुल कादीर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी योग्य माहिती आणि मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा माहितीअभावी सर्वसामान्य नागरिक या योजनांपासून वंचित राहतात. अशा परिस्थितीत हे माहिती केंद्र समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा. तसेच सामाजिक बांधिलकी जपत आपल्या क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
​नगरसेवक शम्स खान व खालीद शेख यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, सामाजिक कार्य आणि जनकल्याणासाठी पीस फाउंडेशनला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. या माहिती केंद्राच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करणे, शांती व सद्भावना वाढवणे, सामाजिक न्यायाची जाणीव करून देणे, तसेच शिक्षण, आरोग्य, रोजगार मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार करणे अशी व्यापक कामे केली जाणार आहेत.
​मुकुंदनगरमधील हे केंद्र सर्वसामान्यांसाठी एक मार्गदर्शक ठरणार असून, शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची अपेक्षा पीस फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading