Education | वैष्णवी गायकवाडचा राज्यात प्रथम क्रमांक; महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत घवघवीत यश

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

सोलापूर | १०.५ | रयत समाचार

(Education) महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सोलापूरच्या कु. वैष्णवी राम गायकवाड हिने मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वैष्णवी ही प्रसिद्ध लेखक समीरबापू गायकवाड यांची पुतणी आहे.

(Education) वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण नु.म.वि. शाळेत झाले. त्यानंतर तिने माध्यमिक शिक्षण दमाणी विद्या मंदिर येथे पूर्ण केले. पुढे ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने अभियांत्रिकी शिक्षण घेतले. विशेष म्हणजे अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षातच तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्तेची झलक दाखवली होती.

अभ्यासू वृत्ती, सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या बळावर वैष्णवीने हे यश मिळवले आहे. तिच्या यशामागे आईवडिलांचे प्रोत्साहन आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.

(Education) वैष्णवी ही मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते राम गायकवाड यांची कन्या आहे. समाजाभिमुख आणि सर्वांना मदतीस तत्पर असणारे कुटुंब म्हणून राम गायकवाड आणि भारती गायकवाड यांची ओळख आहे.
वैष्णवीच्या या यशामुळे गायकवाड कुटुंबाची मान उंचावली असून विविध स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading