अहमदनगर | १६ मे | प्रतिनिधी
(education) बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी सामाजकार्य व संशोधन संस्थेमार्फत एमएसडब्ल्यूच्या द्वितीय वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस रिक्रुटमेंटचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये सहभागी झालेल्या संस्थांमध्ये सामाजिक, आरोग्य, शिक्षण, बालकल्याण, मानवी तस्करीविरोधी कार्य, कौशल्य विकास व प्रशिक्षण या विविध क्षेत्रातील आघाडीच्या १४ नामांकित संस्थांनी सहभाग नोंदवून एमएसडब्ल्यूच्या ८० विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
(education) एप्रिल व मे महिन्यात चार टप्प्यामध्ये पार पडलेल्या या कॅम्पस रिक्रुटमेंट प्रक्रियेत प्रामुख्याने मुंबई येथील कौशल्य विकासासाठी कार्यरत असणारे एडूस्पार्क एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, बंगलूरू येथील अजीम प्रेमजी फाउंडेशन, शिक्षण व पोषण क्षेत्रात कार्यरत असणारे ब्रिटानिया न्युट्रीशन फाउंडेशन पुणे, मुंबई येथील आरोग्य व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे समता फाउंडेशन, पुणे येथील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, मानवी तस्करी रेसक्यु व पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत असणारे फ्रीडम फर्म, छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे रॉकेट लर्निग, अहिल्यानगर येथील संकल्प प्रतिष्टानचे सावली बालगृह, पुणे येथील अक्षर भारती सेवा इंटरनॅशनल, पद्मश्री विखे पाटील हॉस्पिटल अहिल्यानगर, अशा नामांकित संस्थां प्रतिनिधीनी प्रत्यक्ष हजर राहून विद्यार्थ्यांची निवड केली. यासोबतच आदिवासी विकास क्षेत्रात कार्यरत असणारे रायगड मुंबई येथील स्वदेश फाउंडेशन, पुणे येथील शिक्षण व कौशल्य विकासासाठी कार्यरत असणारी मॅजीक बस या संस्था कॅम्पस रिक्रुटमेंटच्या पुढील टप्प्यात सहभागी होणार आहेत अशी माहिती सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी दिली.
(education) कॅम्पस रिक्रुटमेंटपूर्वी प्रत्येक संस्थेच्या प्रतिनिधींनी आपल्या संस्थेची ओळख व उपलब्ध रिक्त पदांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी विविध संस्था प्रतिनिधींशी थेट संवाद साधला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याचे संस्थांचे अधिकारी यांनी सांगितले.
(education) प्लेसमेंट प्रमुख वैशाली पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट विभागाने विद्यार्थ्यांसाठी मुलाखत तंत्र प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, सीव्ही तयार करण्यासाठी कार्यशाळा, मॉक इंटरव्ह्यू असे विविध उपक्रम राबवले होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होवून, प्रभावी सादरीकरण कौशल्य विकसित झाले, आणि करिअरच्या दृष्टीने योग्य दिशा मिळवणे शक्य झाले. विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घेत निवड प्रक्रियेत आत्मविश्वासाने सहभाग घेतला.
(education) यावेळी डॉ. पठारे म्हणाले, विद्यार्थ्यांना केवळ नोकरी मिळवून देणे हा उद्देश नसून, त्यांना समाजकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये योगदान देण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करणे हे संस्थेचे ध्येय आहे. त्यामुळे त्यांना करिअरसाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जातो. समाजकार्य पदवीधरांसाठी नोकरीच्या वाढत्या संधी असून या कॅम्पस रिक्रुटमेंटच्या माध्यमातून १०० टक्के प्लेसमेंट मिळू शकेल असे पठारे यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे व संस्थांचे आभार मानत कॅम्पस रिक्रुटमेंटमुळे सामाजिक क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळत असल्याने समाधान व्यक्त केले. प्लेसमेंट विभागाने दिलेले प्रशिक्षण आत्मविश्वासवृद्धीस उपयुक्त ठरले असा अभिप्राय त्यांनी आवर्जून दिला. कॅम्पस रिक्रुटमेंटच्या विविध संत्राचे सूत्रसंचलन सॅम्युअल वाघमारे यांनी केले तर सदर कॅम्पस रिक्रुटमेंट यशस्वी करण्यासाठी महाविद्यालायचे प्राध्यापक, कर्मचारी व प्लेसमेंट विभागाचे विदयार्थी प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.
हे हि वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.