अहमदनगर |१२ ऑगस्ट | रयत समाचार
(Public issue) शहरातील स्वच्छतेची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग, दुर्गंधी आणि मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना असह्य झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह प्रतिनिधी मंडळाने अहिल्यानगर महानगरपलिका प्रशासक यशवंत डांगे भेटून कचरा प्रश्न त्वरित सोडविण्याची मागणी केली.
(Public issue) तसेच ५ कोटी रुपयांच्या स्वच्छता निधीचा हिशोब तातडीने जाहीर करण्याचीही गंभीर मागणी करण्यात आली. तसेच, ठेकेदाराला प्रत्यक्षापेक्षा अधिक कचऱ्याचे बिल देण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.
(Public issue) अभिषेक कळमकर यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर कचरा थेट मनपा आवारात टाकून आंदोलन छेडले जाईल. शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये रोष असून, याबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत विविध संघटनांनी व्यक्त केले आहे.
