Election: सर्व काँग्रेसजणांनी एक व्हावे – नजीरभाई शेख; जयंत ससाणे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आवाहन

ते पुढे म्हणाले, मागील वेळी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून लहुजी कानडे यांना तालुक्याने निवडून दिले होते. त्यांनी संघटनेकडे थोडेसे दुर्लक्ष केल्याने ससाणे गट त्यांच्यापासून दुरावला तसेच त्यांनी शहराकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांची कामगिरीसुद्धा फारशी समाधानकारक नव्हती याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने यावेळी तरुण तडफदार उमेदवार म्हणून हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली. जयंतराव ससाणे यांनी ज्या पद्धतीने श्रीरामपूर तालुक्याची बांधणी केली होती त्याची आज पुन्हा गरज आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व काँग्रेसजणांनी आपसातील सर्व मतभेद विसरून नवीन पर्वाची सुरुवात करावी. शहरात काँग्रेसमधील दोन्ही गट प्रबळ आहेत. दोन्ही गटांकडे जनमत आहे. त्यामुळे त्याची विभागणी न होता विधानसभा असेल किंवा आगामी काळातील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल याकाळात सर्वांनी एक होऊन काँग्रेस पक्षासाठी काम करावे.
Leave a comment