Education | माहिनूर शेख बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर |१४.५ | रयत समाचार

(Education) शहरातील विद्यार्थिनी माहिनूर आदिल शेख हिने एसएससी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ८८ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. तिच्या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रासह परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माहिनूर शेख हिने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शहरातील नामांकित पी.ए. इनामदार इंग्लिश स्कूल येथे पूर्ण केले.

(Education) सद्यस्थितीत ही शाळा येस फौंडेशन, केरळ यांच्या व्यवस्थापनाखाली कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि स्वतःची मेहनत यांच्या जोरावर माहिनूरने हे यश मिळविले असल्याची भावना व्यक्त केली.

(Education) अभ्यासात सातत्य, वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्याबळावर माहिनूरने बोर्ड परीक्षेत ८८ टक्के गुण मिळवत कुटुंबाचे तसेच शाळेचे नाव उज्ज्वल केले. तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून परिसरातील अनेकांनी तिच्या मेहनतीचे कौतुक केले.
माहिनूरही ज्येष्ठ पत्रकार रियाज शेख यांची नात असून आदिल शेख यांची कन्या आहे. सामाजिक क्षेत्रातकार्यरत असलेल्या कुटुंबातील संस्कार आणि शिक्षणाला दिलेले महत्त्व यामुळेच माहिनूरला यशाचा हा टप्पा गाठता आला, अशी भावना नातेवाईक व मित्रपरिवारातून व्यक्त करण्यात येत आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर माहिनूर शेख हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला असून अहिल्यानगर शहरातील विविध मान्यवर, शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच मित्रपरिवाराने तिचे अभिनंदन केले.
तिच्यापुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त करत उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले आहेत. माहिनूरने भविष्यात उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी उपयुक्त कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या यशामुळे तिच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणा ठरत आहे.
मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यश नक्की मिळते, हे माहिनूरच्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading