अहमदनगर | १२.५ | रयत समाचार
(Politics) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष परेश पुरोहित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना थेट व्हॉट्सअपवर संदेश पाठवत आव्हान, दिल्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. या संदेशामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.
(Politics) व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या कामांचे कौतुक करताना, अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात गेल्या ३०-४० वर्षांत इतका विकास कुणीच केला नाही, असा दावा करण्यात आला आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही भाष्य करत आव्हाड यांनी संग्राम जगताप यांच्याबाबत बोलताना पक्षाध्यक्षांची परवानगी घेतली का, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
(Politics) याचबरोबर संदेशात तुम्हाला इतका मुस्लिमांचा कळवळा का? असा प्रश्न विचारण्यात आला असून, अहिल्यानगर शहरात आलात तर तुमचे स्वागत करतो आणि घोड्यावरून एकदा चक्कर मारून आणतो, असेही नमूद करण्यात आले आहे.
संदेशातील भाषाशैलीवरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दरम्यान, हा संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समर्थक व विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काहींनी हा संदेश आक्रमक राजकारणाचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी तो कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करणारा असल्याचे सांगितले.
या प्रकरणी संबंधित नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया येते का, तसेच पक्ष नेतृत्व याची दखल घेते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
