पाथर्डी | २८ फेब्रुवारी | राजेंद्र देवढे
(Education) आपल्या मुलाला कॉपी देण्याच्या उद्देशाने एका निलंबित नायब तहसीलदाराने आपल्याकडे असलेल्या शासकीय ओळखपत्राचा दुरुपयोग करत बेकायदेशीररित्या परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सामाजिक कार्यकर्ते हरिहर गर्जे व किसन आव्हाड यांनी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. या संदर्भात केंद्रसंचालक शिवाजी दळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटनेतील आरोपी अनिल तोडमल याच्या विरोधात रात्री उशिर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
(Education) तोरडमल याचा मुलगा १२ वी ची परीक्षा पाथर्डी शहरात असलेल्या एका परीक्षा केंद्रात देत असून ही परीक्षा ११ फेब्रुवारीला सुरु झाली. तेव्हापासून तोडमल हा आपल्या मुलासोबत परीक्षा केंद्रात येत होता. त्याच्याकडे असलेल्या शासकीय ओळखपत्रामुळे त्याला कोणी मज्जाव केला नाही. मात्र आज बारावीचा जीवशास्राचा पेपर चालू असताना या केंद्रावर बंदोबस्तास असलेले पोलीस उपनिरीक्षक एम.व्ही. गुट्टे यांना तोरडमल यांच्यावर संशय आल्याने त्यांनी याची माहिती दळे यांना दिली. दळे यांनी तोडमल यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली तर त्या नंतर आपण अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार असून आपला मुलगा परीक्षा देत असल्याने आपण या ठिकाणी आलो असल्याचे सांगितले. आपल्याला परीक्षा केंद्राबाहेर जाऊ द्या, अशी विनंती त्याने अनेकवेळा पोलीस व केंद्रसंचालकांना केली मात्र त्याला पोलिसांनी बाहेर जाऊ दिले नाही.
(Education) दरम्यान या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे परीक्षा केंद्रात दाखल झाले. त्यांनी तोरडमल याची चौकशी करत त्याला पोलीस स्टेशनला नेले. तोरडमल याच्यावर गुन्हा दाखल करू नये म्हणून काही जण पोलीस स्टेशनला आले होते. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. दरम्यान गेल्या अकरा तारखेपासून तोडमल हा परीक्षा केंद्रात येत असताना कोणाच्याही लक्षात हा प्रकार न आल्याने नवल व्यक्त केले जात आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.