अहमदनगर |२१ ऑगस्ट | रयत समाचार
(Education) शिक्षण सेवक पदाचे आदेश गेल्या पाच महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आले होते. या संदर्भात शिक्षण संचालक शरद गोसावी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बाब मांडण्यात आली. त्यांनी तत्काळ कार्यवाहीचे तोंडी निर्देश शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना दिले.
(Education) शिक्षणाधिकारी यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचे शिक्षण सेवक पदाचे आदेश पारित करून जकेरीया आघाडी प्राथमिक शाळेचे (यतीमखाना अँड बोर्डींग) मुख्याध्यापक यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सुपूर्द केले. या निर्णयामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
(Education) शहरातील विविध वृत्तपत्रांमध्ये या विषयावर सातत्याने बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानले.
