Education | कुंभमेळ्यासाठी विद्यार्थ्यांकडून ‘सेवा’ घेऊन श्रेयांक देण्याच्या निर्णयास ‘एआयएसएफ’चा विरोध

2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नाशिक | १०.२ | रयत समाचार

(Education) नाशिकमधे २०२६- २७ दरम्यान होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध सेवा करून घेऊन त्याबदल्यात शैक्षणिक श्रेयांक (क्रेडिट्स) देण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेल्या ठरावाला ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) नाशिकने तीव्र आक्षेप घेतला.

(Education) या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शोषण होण्याची शक्यता असून, कामांचे स्वरूप, कालावधी, नियंत्रण यंत्रणा, सुरक्षितता तसेच आरोग्य सुविधांबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याचे AISF ने नमूद केले आहे.

या संदर्भात AISF नाशिकच्या वतीने सहाय्यक कुल सहसचिव श्रीपाद बुरकुले यांना निवेदन देण्यात आले.

(Education) धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाच्या विरोधात निर्णय? : AISF ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, सार्वजनिक विद्यापीठांना धार्मिक कार्यक्रमांशी शैक्षणिक श्रेयांकांच्या माध्यमातून जोडणे हे संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. श्रमाच्या बदल्यात श्रेयांक देण्याऐवजी पर्यायी मनुष्यबळ व्यवस्था करण्यात यावी, तसेच या ठरावाची सखोल व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
विद्यार्थ्यांचे शोषण होणार नाही- बुरकुले यांचे आश्वासन : निवेदन सादर केल्यानंतर सहाय्यक कुल सहसचिव श्रीपाद बुरकुले यांच्यासोबत AISF च्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शोषण होणार नाही, यासाठी योग्य तरतुदी परिपत्रकात समाविष्ट करण्यात येतील, तसेच संबंधित मुद्द्यांवर विचार करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी AISF महाराष्ट्र राज्य सहसचिव कॉम्रेड प्राजक्ता कापडणे, नाशिक शहर सहसचिव कॉम्रेड हर्षाली आडांगळे, तसेच कॉम्रेड राहुल भुजबळ, कॉम्रेड मोनिका पागे, कॉम्रेड रवी आदी उपस्थित होते.Education

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’

Share This Article