Education | इतिहासतज्ज्ञ प्रो. डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांची दिल्ली विद्यापीठ इतिहास विभाग प्रमुखपदी निवड

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read

नवी दिल्ली | २४.९ | रयत समाचार 

प्रो. डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी काल बुधवारी ता. २३ सप्टेंबर २०२५ रोजी दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठात ऐतिहासिक अभ्यास, संशोधन व शैक्षणिक कार्यास नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

डॉ. देशपांडे यांनी एम.फिल. व पीएच.डी.चे संशोधन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पूर्ण केले. त्यानंतर नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी येथे त्यांनी संशोधन केले. आपल्या कारकिर्दीची सुरुवात मोतीलाल नेहरू कॉलेज, दिल्ली येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून केली. सन २००९ मध्ये ते दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

 

इतिहासलेखनाचा अभ्यास, सैन्य इतिहास, चित्रपटांचा सामाजिक इतिहास इत्यादी त्यांचे अभ्यासाचे विषय असून त्यांनी यावर आधारित अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लेखन केले आहे. त्यापैकी ‘ऐतिहासिक नौसैनिक बिद्रोह और भारतीय जन आंदोलन, 1946, The British Raj and Its Indian Armed Forces (1857–1939) सहसंपादक : पार्थ सारथी गुप्ता, King, Country and War: Ideology, Memory and Written Indian History, c.1600–1900, Corona Fieldwork & Other Stories, Marathas, Rajputs and Afghans in Mid-Eighteenth-Century India (NMML पेपर), Critical Social Science Perspectives on Indian Cinema सहसंपादक अनघा कांबळे, Glorious 50 Years of the Border Security Force, Dreamt Lives, Class, Power and Consciousness in Indian Cinema and Television या पुस्तकांना देश-विदेशात शैक्षणिक क्षेत्रात विशेष मान्यता मिळाली आहे.

 

पीएच.डी. संशोधकांना त्यांनी दिलेले शैक्षणिक मार्गदर्शन आणि इतिहासाची चिकित्सक समज घडविण्याचे त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. इतिहास क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाची दखल घेत, त्यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading