स्वलिखीत कविता, चारोळ्यांमधून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
नेवासा | ९ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(education) तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन १९९९-२००० एस.एस.सी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा सर्व वर्गमित्र आपल्या शिक्षकांसह एकत्र आले, परिचय सत्र, मनोगत, गप्पागोष्टींचा या स्नेहमेळाव्यात सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
(education) यावेळी विद्यालयाचे माजी प्राचार्य एल.आर. धुमाळ, सेवानिवृत्त संस्था निरीक्षक रंगनाथ भापकर, श्रीमती भापकर, सेवानिवृत्त पर्यवेक्षक पोपट साठे, श्रीमती साठे, साहित्यिका मनीषा लबडे – दहातोंडे उपस्थित होते. या सर्वांनी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन केले.
स्नेहमेळावा प्रसंगी ॲड.राठोड, अर्चना वर्मा, मंगल रिंधे, विठ्ठल धुमाळ, प्रा.नंदकिशोर दहातोंडे, ज्ञानेश्वर होंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अण्णासाहेब दहातोंडे, गणेश दहातोंडे, डॉ. अजित दहातोंडे, संदीप दहातोंडे व इतर माजी विद्यार्थी यांनी सहकार्य केले. देविदास दहातोंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदाचे प्रसिध्दी विभाग प्रमुख, साहित्यिक, कवी व निवेदक काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर यांनी स्वलिखीत कविता व चारोळ्यांमधून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.
हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी