Culture | श्रीधर फडके यांच्या संगीतप्रवासाचा सुवर्णमहोत्सव; कल्याणमध्ये ‘येथोनि आनंदु रे’ विशेष सांगीतिक सोहळा

कल्याण | २२.२ | गुरुदत्त वाकदेकर

सुप्रसिद्ध संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या सांगीतिक प्रवासाचा सुवर्णमहोत्सव (५० वर्षे) आणि त्यांच्या वयाचा अमृतमहोत्सव (७५ वर्षे) या दुहेरी औचित्याने ‘येथोनि आनंदु रे’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी कल्याण येथील अत्रे रंगमंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात स्वतः श्रीधर फडके यांचे सादरीकरण, त्यांनी स्वरबद्ध केलेल्या अजरामर रचनांचे नामवंत गायकांकडून गायन, त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा मागोवा आणि त्यांचा हृद्य नागरी सत्कार असा बहुरंगी कार्यक्रम रसिकांना अनुभवता येणार आहे. केवळ कल्याण-डोंबिवलीपुरतेच नव्हे, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात श्रीधर फडके यांच्या संगीतसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा असा सोहळा प्रथमच आयोजित करण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी सुमारे ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. उपक्रमाचा खर्च वजा जाता उर्वरित रक्कम वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षांनिमित्त प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘वंद्य वंदे मातरम्’ या पुस्तकाच्या २५,००० प्रतींच्या विनामूल्य वितरणासाठी वापरण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी नागरिकांनी विविध स्वरूपात सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सत्कार समितीचे सभासदत्व घेऊन निधी संकलन, तिकीट विक्री व इतर कार्यात सहभाग घेणे, ‘येथोनि आनंदु रे’ उपक्रमासाठी तसेच ‘वंद्य वंदे मातरम्’ पुस्तकासाठी जाहिरात किंवा देणगी देणे, प्रवेशिका विकत घेऊन परिचितांना सहभागी होण्याचे आवाहन करणे आणि सोशल मीडिया तसेच वृत्तपत्र माध्यमातून प्रसिद्धीसाठी सहाय्य करणे, असे विविध मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या उपक्रमात सहभागी होऊन तो यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयोजक सुकन्या जोशी ९४२२७५५१८९ आणि योगेश जोशी ९७५७०७७६१४ यांनी केले आहे. या आगळ्यावेगळ्या सांगीतिक पर्वणीला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही त्यांनी कळविले आहे.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading