अहमदनगर | १९ मे | प्रतिनिधी
(Cultural Politics) शिबिर म्हणजे भक्ती आणि शक्तीचा योग्य संगम गीता परिवारच्या वतीने आयोजित बालसंस्कार शिबिराच्या समारोप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना राजाभाऊ मुळे यांनी प्रतिपादन केले. यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. रेणुका पाठक उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, बाल वयात विद्यार्थ्यांना योग्य संस्कार मिळाले तर ते देश पुढे घेऊन जाण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात, असे विद्यार्थी भारताची संस्कृती टिकून ठेवतील आणि असे विद्यार्थी तयार करण्याचं काम गीता परिवार मोठ्या प्रमाणात करत आहे. उत्तम आरोग्यदायी आहार कसा असावा, या विषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
(Cultural Politics) गीता परिवाराचे शहर अभिभावक नंदलालजी मणियार यांनी चारित्र्यवान, कार्यकुशल, आत्मनिर्भर, श्रद्धावान, सत्कर्मरत, भावी पिढी निर्माण करण्यासाठी भारतीय ऋषीप्रणीत संस्कार बालकामध्ये रूजवणे महत्वाचे आहे, असे मत मांडले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनंदा सोमानी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना सांगितले की, स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी स्थापन केलेल्या गीता परिवाराचा डॉ. संजय भैय्या मालपाणी यांनी भारतातच नाही तर विदेशातही विस्तार केला.
(Cultural Politics) यावर्षी येथे केंद्रांची संख्या सहा करण्यात आली होती. लहान वयोगटातील पहिली ते तिसरी या गटालासुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रतिसाद मिळाला. गीता परिवारा सोबत कार्यकर्ता म्हणून कार्य करण्याची इच्छा असेल तर उपस्थित पालक नाव नोंदवु शकता, अशी सुचना त्यांनी केली. सेक्रेटरी सोमनाथ नजान, उपाध्यक्षा प्रतिभा बजाज, कोषाध्यक्षा अलका नावंदर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळी सुट्टीत गीता परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरात सहा विविध ठिकाणी आयोजित या संस्कार वर्गाचा सव्वा दोनशे विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या संस्कार वर्गात विद्यार्थ्यांना श्लोक, स्तोत्र, देशभक्तीपर गाणी, भजनं, भगवद्गीता शिकवण्यात आली. संस्कारक्षम कथा सांगितल्या, मुलांना संस्कार वर्गाची गोडी लागावी यासाठी खेळ, क्राफ्ट, जादूचे प्रयोग, वैज्ञानिक प्रयोग यांची मदत घेतली गेली. यावर्षी शिबिरामध्ये ज्ञानेंद्रिय संवर्धन यावर विशेष भर होता.
समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिबिरात शिकवल्या गेलेल्या या सगळ्याचे सादरीकरण केले. सगळ्या सहा केंद्राच्या विद्यार्थ्यांनी रामायण संकल्पनेवर आधारित प्रस्तुती सादर केल्या. एकापेक्षा एक बहारदार प्रस्तुतीने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. पालकांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की संस्कार वर्गात तुम्ही घेतलेल्या स्पर्धांची तयारी करताना मुलांचा मोबाईलचा वेळ कमी तर झालाच पण त्यांना भारतीय संस्कृती कडे वळण्यासाठी दिशादर्शन ही मिळालं. असे उपक्रम सातत्याने आयोजित व्हायला हवे, अशी अपेक्षाही पालकांनी व्यक्त केली.
संस्कार वर्गाच्या कालावधीत विविध स्पर्धा संपन्न झाल्या. त्यातील विजेतांना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्यामा मंत्री व आभार प्रदर्शन दीपा शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गीता परिवारच्या सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हे हि वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770

