मराठी सक्तीवर ठाम भुमिका
मुंबई | ९ जुलै | प्रतिनिधी
(Cultural Politics) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल ता.८ रोजी शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीच्या प्रतिनिधींशी त्यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी सविस्तर चर्चा केली. सकाळी १०:३० वाजता झालेल्या या बैठकीत शालेय शिक्षणातील महत्त्वाचे मुद्दे, मराठी शाळांची स्थिती आणि भाषिक अस्मितेचे प्रश्न केंद्रस्थानी होते.
(Cultural Politics) समितीच्यावतीने निमंत्रक डॉ. दीपक पवार, मराठी शाळांचे सदिच्छादूत चिन्मयी सुमीत आणि कार्यवाह आनंद भंडारे यांनी सहभाग घेतला. नुकत्याच पार पडलेल्या धरणे आंदोलनाच्या मागण्या आणि समितीची भूमिका राज ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात आली.
(Cultural Politics) फडणवीस सरकारने इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा सक्ती करण्याचा प्रयत्न केला. यावर जनभावना अधिक तीव्र असल्याने डॉ. नरेंद्र जाधव समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, पहिलीपासून तिसरी भाषा सक्ती आपण कधीही मान्य करणार नाही, हे ठाम मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यामुळे या संदर्भातील अहवालाबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
SCERTचे संचालक राहुल रेखावार हे NCERTच्या पाठ्यपुस्तकांचा अवलंब बालभारतीच्या माध्यमातून सक्तीने लागू करण्याचा अयोग्य प्रयत्न करत असल्याचा मुद्दा समितीने मांडला. असे झाल्यास बालभारती केवळ अनुवादीत पुस्तके तयार करणारे गोदाम बनण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
मराठी शाळांचे सक्षमीकरण अत्यंत आवश्यक असून यासाठी ‘आदर्श मराठी शाळा’ उभारण्याची कल्पना राज ठाकरे यांनी मांडली. तसेच महापालिकांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध योजना राबवण्याची शक्यता असल्याचे सांगून, पुढच्या बैठकीत याबाबत समितीने सविस्तर टिपण सादर करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ही माहिती महाराष्ट्रधर्म आणि मराठी भाषा सर्वोपरि मानणारे कार्यकर्ते डॉ. दीपक पवार यांनी दिली.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.