पुणे | २०.६ | रयत समाचार
(Chhatrapati Shivaji Maharaj Books) मराठा इतिहासाचा सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्या इतिहासप्रेमी, संशोधक, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आणि शिवचरित्र अभ्यासकांसाठी इतिहासकार इंद्रजित सावंत लिखित दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचा संच आता घरपोहोच उपलब्ध झाला आहे. ‘शोध भवानी तलवारीचा’ आणि ‘प्रतापगडाची जीवनगाथा’ या संशोधनाधारित पुस्तकांचा संच कॅश ऑन डिलिव्हरी (COD) सुविधेसह मागवता येणार आहे.
(Chhatrapati Shivaji Maharaj Books) ‘शोध भवानी तलवारीचा’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीचा, वाघनखांचा आणि इतर ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचा उपलब्ध पुरावे, संदर्भ, दुर्मीळ छायाचित्रे आणि ऐतिहासिक साधनांच्या आधारे संशोधक दृष्टीने अभ्यास करण्यात आला आहे. शिवरायांच्या भवानी तलवारीविषयी असलेल्या विविध समजुतींचा चिकित्सक आढावा घेत सध्या ती तलवार नेमकी कुठे आहे, याचा प्रभावी शोध या पुस्तकातून मांडण्यात आला.
(Chhatrapati Shivaji Maharaj Books) ‘प्रतापगडाची जीवनगाथा’ या पुस्तकात प्रतापगडाच्या निर्मितीपासून आजपर्यंतचा इतिहास, गडाचे सामरिक महत्त्व, अफजलखान वधाशी संबंधित घटना आणि अनेक ऐतिहासिक संदर्भांचा सखोल वेध घेण्यात आला आहे. अफजलखान वधावेळी शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर केला होता का? कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा मृत्यू नेमका कसा झाला? अशा अनेक चर्चित प्रश्नांची संदर्भाधारित मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे. दुर्मीळ चित्रे, छायाचित्रे आणि ऐतिहासिक पुराव्यांमुळे हे पुस्तक संग्राह्य ठरते.
दोन्ही पुस्तके प्रत्येकी १९२ पानांची असून उत्कृष्ट दर्जाच्या सफेद कागदावर पेपरबॅक स्वरूपात प्रकाशित करण्यात आली आहेत. प्रत्येक पुस्तकाची किंमत २५० रुपये असून दोन्ही पुस्तकांचा संच ५०० रुपये आहे. ५० रुपये कुरिअर शुल्कासह ५५० रुपयांत घरपोहोच उपलब्ध असून कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधाही देण्यात आली.
पुस्तक संच मागवण्यासाठी इच्छुकांनी बुकविश्व, पुणे येथे 8999505011 या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा. तसेच ऑनलाइन ऑर्डरसाठी Book Now पर्यायाचाही वापर करता येणार आहे. लिंक पहा : https://www.facebook.com/share/p/1EBLwzA2QF/
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



