अहमदनगर | १६ जून | प्रतिनिधी
(Business) सुरभि हॉस्पिटलचे संचालक आणि प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. विलास व्यवहारे यांनी नुकतीच विधी शाखेतील (LL.B.) पदवी प्राप्त केली. वैद्यकीय क्षेत्रासोबतच कायदाशास्त्रातही आपली उमदेगिरी सिद्ध करणाऱ्या डॉ. व्यवहारे यांचा हॉस्पिटलच्यावतीने गौरव करण्यात आला.
(Business) या विशेष प्रसंगी हॉस्पिटलचे चेअरमन अनिरुद्ध देवचक्के यांच्या हस्ते डॉ. व्यवहारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मेडिकल डायरेक्टर व पोटविकारतज्ञ डॉ. वैभव अजमेरे, अतिदक्षता विभागतज्ञ डॉ. प्रियन जुनागडे, हृदयरोगतज्ञ डॉ. अमित भराडिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर जंगम, संचालक (ऍडमिनिस्ट्रेशन) ॲड. गणेश शेंडगे, संचालक (बिझनेस डेव्हलपमेंट) डॉ. अमित पवार, संचालक व वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार शेवगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
(Business) सत्कार प्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी डॉ. व्यवहारे यांच्या ज्ञानाची बहुआयामी वाटचाल ही वैद्यकीय सेवेसोबतच कायदाशास्त्राच्या माध्यमातून रुग्णांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण करेल, असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. व्यवहारे यांच्या या नव्या शैक्षणिक टप्प्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात कायद्याचा अधिक योग्य उपयोग करून सामाजिक न्याय मिळविण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
