(Bureaucracy) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ता. १५ जुलै रोजी एक नवोपक्रम राबविण्यात आला असून, ‘आपला जिल्हा, आपला जिल्हाधिकारी’ या संकल्पनेतून जिल्हाधिकारी भेटीची नोंदणी आता QR कोडच्या माध्यमातून करता येणार आहे.
(Bureaucracy) या उपक्रमाचा शुभारंभ परिवेक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी शिवांश सिंह यांच्या हस्ते झाला. या उपक्रमाची संकल्पना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची असून नागरिकांना आता जिल्हाधिकाऱ्यांशी थेट वेळ निश्चित करून भेट घेता येईल. भेटीची वेळ दर बुधवार आणि शुक्रवार या दिवशी ठरवता येईल.
(Bureaucracy) QR कोड प्रणालीचा वापर कसा कराल : १. QR कोड स्कॅन करा. २. तारीख व वेळ निवडा. ३. आपली संपूर्ण माहिती भरा. ४. सबमिट केल्यानंतर ई-मेलवर वेळ निश्चितीचा संदेश मिळेल.
उपक्रमाचे महत्त्व : वेळ वाचणार, गर्दी कमी होणार. कार्यालयात थेट उपस्थित राहण्याऐवजी डिजिटल सुविधा. वेळेवर सेवा मिळणार, पारदर्शकता वाढणार.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नांवदर, अंजली शर्मा, के. के. कनवरीया, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे आदींसह सर्व तहसीलदार व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले, प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. हा उपक्रम लोकांच्या वेळेची बचत करतो, संवाद सुलभ करतो आणि विश्वास निर्माण करतो.