(Art) जिल्ह्यातील आंबेगाव बु || येथे ता. १० जुलै रोजी ‘राई आर्ट’च्या नूतन कलादालनाचे भव्य उद्घाटन मातोश्री सुशीला कल्लप्पा मोर्ती यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंबेगाव बु.चे उपसरपंच अनिलभाऊ कोंढरे, प्रसिद्ध लेखक नितीन थोरात, उद्योजक सुनीलशेठ नवले, दत्तात्रय कामठे-पाटील, युवराज बेलदरे, चित्रपट निर्माते प्रजोत्त पेंढारकर, ऐतिहासिक शस्त्र अभ्यासक राहुल गोरे, इतिहास अभ्यासक व लेखक प्रसाद दांगट-पाटील, सेट डिझायनर ललित पवार, गीतकार संतोष सातपुते आणि संतोष हिरेमठ यांची उपस्थिती लाभली.
(Art) राजवारसा आर्टिफॅक्ट्स, मिनीक्रियेचर, रणमर्द आर्ट्स, शिवराय आर्ट्स, शिवप्रताप आर्ट्स आणि श्री शिवशंभू क्रिएशनसारख्या संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवारही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
(Art) नूतन दालनामध्ये शिवकालीन मूळ चित्रांवर आधारित चित्रकला, मूर्त्या, शिवछत्रपतींचे प्रिंटेड टी-शर्ट्स, विविध धार्मिक मूर्ती व पुस्तके ठेवण्यात आली आहेत. हे सर्व साहित्य ऑनलाईन व प्रत्यक्ष विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. राई आर्टतर्फे लवकरच शिवस्वरुप शस्त्रधारी मूर्ती, पारंपरिक जिरेटोप, बॅचेस आणि अन्य सांस्कृतिक वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमोद कलाप्पा मोर्ती यांनी दिली. अधिक माहितीसाठी 9960058542 या क्रमांकावर संपर्क साधावा.