अहमदनगर | २० फेब्रुवारी | प्रतिनिधी
(Art) जगभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होत असताना, अहमदनगरच्या सुप्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट प्रियंका आगरकर यांनी एक अनोखी कला सादर केली. त्यांनी नैसर्गिक मेहंदीच्या माध्यमातून शिवरायांचे सुंदर पोर्ट्रेट साकारले.
(Art) आगरकर या ‘प्रियंका मेहंदी स्टुडिओ अँड अकॅडमी’च्या संचालिका असून, त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुमारे २ ते ३ तास अथक मेहनत घेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे हुबेहूब चित्र मेहंदीच्या माध्यमातून रेखाटले. शिवरायांचे तेजस्वी रूप आणि शौर्य दर्शवणारे हे पोर्ट्रेट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
(Art) शिवजयंतीच्या पवित्र सोहळ्यात कला आणि परंपरेचा संगम घडवण्याचा प्रयत्न प्रियंका आगरकर यांनी केला असून, त्यांच्या या नवकल्पनात्मक कार्याचे विविधस्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या सृजनशील कलाकृतीमुळे शिवभक्त आणि कलाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हे ही वाचा : साहित्यवार्ता | नाथसंप्रदायातील मंत्रतंत्र – टी. एन. परदेशी