Art | राजेश खन्ना | काकाजींचे पुण्यस्मरण; डॉ. राजीव सूर्यवंशी यांचा ‘चित्रसंवाद’ वाचा

उपसंपादक | दिपक शिरसाठ Artist | Dr.Rajeev Suryvanshi
सत्यमेव जयते

चित्रसंवाद | १८ जुलै | डॉ. राजीव सूर्यवंशी

(Art) मी थिएटरमध्ये पाहिलेला पहिला सिनेमा होता, हाथी मेरे साथी. अर्थात ही माहिती आमच्या मातु:श्रींकडून मिळालेली. कारण मी तेंव्हा जेमतेम एक वर्षाचा होतो. पुढे हट्टाने डबल बटण असलेला जॅकेट वाला ड्रेस शिवून झाला आणि रिपीट रनला थिएटरमध्ये आणि नंतर कित्येकदा टीव्हीवर हाथी मेरे साथी पुन्हा पुन्हा पाहिला. दुर्दैवाने मला सिनेमाची गोडी किंवा चटक म्हणा हवं तर लागली तेंव्हा आम जनतेच्या हृदयाच्या आणि सुपरस्टारपदाच्या सिंहासनावरून जतीन उर्फ राजेश खन्ना यांची उचलबांगडी होऊन ती जागा ‘साहेबांनी’ बळकावली होती.

Art

(Art) अँग्रीयंगमॅनचा जमाना सुरू झाला होता. जंजीर, दिवार, शोले, त्रिशूल सारखे जबरदस्त सिनेमा एखाद्या तोफगोळ्यासारखे सिनेसृष्टीला हादरवत होते. या झंझावातात काही लवचिक मंडळी तगली पण स्वतःच्या प्रेमात आकंठ बुडालेला, चाहत्यांच्या आणि चमच्यांच्या गराड्यातला काका मात्र ताठा मिरवत कोसळला. लहान वयात मिळालेलं उत्तुंग यश इतक्या जलद गतीनं निसटून जाईल हे त्याला सहनच झालं नाही.

 

(Art) आम्ही उच्च माध्यमिक विद्यालयात असताना जमेल तसा आणि परवडेल तसा चित्रपटांचा अखंड यज्ञ चालू ठेवला होता. त्यात कधी कधी मिळेल तो सिनेमा पाहिला जायचा. आमच्या यज्ञाकर्मात ‘मास्टरजी’ आणि ‘मकसद’ या चित्रपटांची आहुती देखील पडली होती. राजेश खन्नाबद्दलची नावड आता आणखीनच वाढली. तेंव्हातर आमच्या बच्चनच्या कडक आवेशापुढे खन्ना एकदमच दयनीय वाटायचा.

 

मग थोडं मोठं झाल्यावर समजुतीने काकाजींचे एकेक सिनेमे पाहिले. ‘खन्ना मॅटिनी’ च म्हणाना! राज, आनंद, खामोशी, बावर्ची, इत्तेफाक, सच्चा झूठा, अपना देश, दुष्मन, नमक हराम, अंदाजमधला त्याचा कॅमिओपण आवडलेला. वाटलं, अरे.. एव्हढा वाईट नव्हता हा! आणि मग खन्ना आपल्याला थोडाफार आवडायला लागला. फक्त त्याचे ते हातवारे, मॅनेरिझम्स डोक्यात जायचे. दुसऱ्या डावातले सौतन, अवतार, अमृत, आज का एमएलए, स्वर्ग हे ही बरे होते, पण नंतर राजेश खन्नाला कुणी डोक्यावर घेतलं नाही. राजकारण, टीव्ही मालिका, सी ग्रेड सिनेमा, जाहिरात, सगळं सगळं करून झालं आणि मग राजेश खन्ना अगदी दिसेनासा झाला. तो गेला तेंव्हा त्याच्यासोबत म्हणलं तर सगळे होते आणि म्हणलं तर कुणीच नव्हतं!
त्याचे शेवटचे शब्द होते पॅक अप!! आज काकाजींचे पुण्यस्मरण! त्यांना वाहिलेली ही चित्रांजली!
Art
डॉ.राजीव सूर्यवंशी

हे ही वाचा : साप्ताहिक ‘ई-मार्मिक’

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *