Art | अपॅकतर्फे 19 वी आंतरराष्ट्रीय छायाचित्रण तर 8 वी एगाता चित्रकला स्पर्धा

आईस, ग्लास आणि ग्रीनरी विषय निश्चित

SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ५.२ | गुरुदत्त वाकदेकर

(Art) अपॅक आर्ट फोटोग्राफी अ‍ॅडव्हेंचर क्राफ्ट ट्रेनिंग अँड सर्व्हिसेस (APAC) यांच्या वतीने १९ वी आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धा तसेच ८ वी एगाता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आईस, ग्लास आणि ग्रीनरी हे तीन विषय निश्चित करण्यात आले आहेत.

(Art) स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२६ आहे. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा द बॉम्बे आर्ट सोसायटी, के. सी. मार्ग, रंगशारदा समोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई – ५० येथे आयोजित करण्यात येणार आहे.

छायाचित्रण स्पर्धेसाठी छायाचित्राचा आकार १२ × १८ इंच व ३०० डीपीआय असणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त ५ प्रवेशिका पाठवता येतील. प्रति प्रवेशिका शुल्क ३०० रुपये असून अपॅक सदस्यांसाठी एक प्रवेशिका मोफत देण्यात येणार आहे.

छायाचित्रे [email protected] या इमेलवर पाठवायची आहेत.

(Art) चित्रकला स्पर्धेसाठी चित्राचा आकार १२ × १८ इंच, स्ट्रेच्ड कॅनव्हासवर आणि कोणत्याही माध्यमात असावा. प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका स्वीकारण्यात येतील. प्रति प्रवेशिका शुल्क अपॅक सदस्यांसाठी ४०० रुपये, तर इतरांसाठी ५०० रुपये आहे. अपॅकचे वार्षिक सभासद शुल्क १,००० रुपये असून स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी ९३२३९५०९७७ / ९३२४२५०३७१ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. व्हॉट्सॲप क्रमांक ८४५२९६०४८८ आहे. या स्पर्धेसाठी एचपी/रेडिंग्टन हे मुद्रण पार्टनर असून ईझीवे हे गिफ्ट पार्टनर आहेत.

हे ही वाचा : Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

https://rayatsamachar.com/archives/6335

Share This Article