बाळासाहेब पवार स्मृती करंडक .
अहमदनगर | ३१ डिसेंबर | तुषार सोनवणे
Ahilyanagar News येथील डिफेन्स स्पोर्टस अकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या बाळासाहेब पवार स्मृती करंडक लेदर बॉल मुलांच्या अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत समर्थ क्रिकेट ॲकॅडमी संघाने अंतिम फेरीत धडक मारली.
शनिवारी २८ डिसेंबर रोजी प्रियदर्शनी क्रिकेट अकॅडमी आणि समर्थ क्रिकेट अकॅडमी यांच्यात झालेल्या सामन्यात समर्थ अकॅडमी ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रियदर्शनी ॲकॅडमी संघाने ३८.२ ओव्हरमध्ये सर्व बाद १८७ धावा केल्या, त्यात समर्थ कोळसे ४८ बॉल २५ धावा आणि विराज राजपूत ३२ बॉल २० धावा, यांचे मोलाचे योगदान राहिले. समर्थ अकॅडमीच्या नरेंद्र सावज या गोलंदाजाने ३ फलंदाज बाद केली तर दर्श देसरडा आणि अरिघ्न निंबाळकर या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
(Ahilyanagar News) प्रत्युत्तरादाखल खेळताना समर्थ क्रिकेट अकॅडमीच्या सलामीवीर अनिकेत सिनारे याच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर समर्थने हा सामना ३५.२ ओव्हरमध्ये १९१/७ मधे सहज जिंकून फायनलमध्ये धडक मारली. अनिकेतने १०६ बॉलमध्ये नाबाद ८९ धावांची खेळी केली यात त्याने ११ चौकार मारले अनिकेतने प्रेक्षकांची मने जिंकली आणि सामन्याचा सामनावीराचा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारही पटकावला.
(Ahilyanagar News) यावेळी त्याचे स्पर्धेचे मुख्य आयोजक कपिल पवार यांनी विशेष कौतुक केले. अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रियदर्शनीकडून गोलंदाजी करताना गौरव काळे आणि आर्यन गरजे या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. सामन्याचे अंपायर म्हणून सागर बनसोडे यांनी काम पाहिले.
हे हि वाचा : द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
अभिनंदन