अहमदनगर | १३ सप्टेंबर | विजय मते
ज्याप्रमाणे शिष्याला जीवनात गुरुशिवाय महत्त्व प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील शिक्षकांशिवाय स्थान निर्माण होऊ शकत नाही. आता काळ बदलला आहे खडू, फळाऐवजी व्हाईटबोर्ड, मार्कर, ऑडिओ-व्हिडिओ अशा तंत्रज्ञानाचा वापर Education शिक्षणामध्ये होऊ लागला. डिजिटल, विज्ञानयुगात देखील विद्यार्थ्यांच्या जीवनातून शिक्षक कधीच वजा करता येत नाही, असे प्रतिपादन सेवा शिक्षण संस्थेचे संचालक साई पाअुलबुधे यांनी केले.
नारायणडोह येथील डॉ.ना.ज.पाऊलबुधे तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये शिक्षकदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे सेवा शिक्षण संस्थेचे संचालक पाअुलबुधे यांच्या हस्ते भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य बाळासाहेब बोर्डे, प्राचार्या मयुरी म्याना, डॉ.गौरव साळी, डॉ.रोहिणी साळी, बाळासाहेब साठे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
साई पाअुलबुधे पुढे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वोच्च असते. गुरूंची शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. शिक्षक केवळ मार्गदर्शक नसतो तर दिशादर्शक असतो. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या जीवनाला वेगळी दिशा मिळत असते.
प्राचार्य बाळासाहेब बोर्डे यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनचरित्र बाबत माहिती दिली. त्यांचा जन्मदिवस म्हणून शिक्षकदिन साजरा करण्यात येतो. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केवळ आपल्या भारतात नव्हे तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, जर्मनी, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, चिली या देशांमध्ये याच दिवशी शिक्षकदिन साजरा केला जातो.
डॉ. गौरव साळी, बाळासाहेब साठे, विश्वनाथ आदवडे आदींनी मनोगत व्यक्त केले. समर्थ राऊत, चैतन्य पालवे, क्रांती म्हस्के यांनी शिक्षक दिनाविषयी आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिव्हिल इंजीनिरींग प्रमुख जयश्री होले, सुप्रिया भाबड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन खुशी रासकर यांनी तर आभार विश्वजीत पवार यांनी मानले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा