Scholarship: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षणशुल्क शिष्यवृत्ती योजना - Rayat Samachar
Ad image

scholarship: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षणशुल्क शिष्यवृत्ती योजना

68 / 100

 मुंबई | १० ऑगस्ट | प्रतिनिधी 

तंत्रशिक्षण विभागाकडून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय, शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठासह), विनाअनुदानित (खाजगी अभिमत विद्यापीठे व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) महाविद्यालये / तंत्रनिकेतनामध्ये सुरु असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (व्यवस्थापन कोट्यातील /संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणशुल्क प्रतिपूर्ती योजना’ scholarship सन २००६-०७ पासुन लागू केली. सन २०१७-१८ मध्ये योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी या योजनेचे नामकरण ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना’ Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyavrutti Yojna असे करण्यात आले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

या योजनेकरीता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (दोन्ही पालकांचे एकत्रित) रुपये ८ लाखांपर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

• शिष्यवृत्ती रक्कम – योजनेंतर्गत विद्यार्थी ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असेल, त्या अभ्यासक्रमाकरिता आकारण्यात येणारे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रकमेच्या लाभ मुले / मुलींना खालील प्रमाणे देण्यात येतो.

१) प्रकार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा अभ्यासक्रम विद्यार्थी शैक्षणिक शुल्काच्या परीक्षा शुल्काच्या शिष्यवृत्ती ८ लाखापर्यंत व्यवसायिक मुले ५० टक्के. व्यवसायिक मुली १०० टक्के

योजनांची मंजुर रक्कम (दोन हप्त्यांमध्ये, पहीला हप्ता हा ऑक्टोबर महीन्याच्या पहील्या आठवड्यापर्यंत व उर्वरित दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत) विद्यार्थ्यांना (त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये)/ संस्थांना डीबीटी पोर्टलद्वारे जमा करण्यात येते.

योजना लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पध्दत –

१) संस्थेमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in वर देण्यात आलेल्या युजर मॅन्युअल व सुचनांचे पालन करुन, डिबीटी पोर्टलवर दर्शविण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार संपुर्ण अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावे.

२) ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्नीत नाहीत त्यांनी जवळच्या आधारकेंद्रावर जाऊन आपले आधारकार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्न करुन घ्यावेत.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

TAGGED:
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
1 Comment