women:१५ ऑगस्टला होणार 'स्नेहसंवर्धन पुरस्कार' वितरण; केरळकन्या सिंधुताई मानकरी - Rayat Samachar

women:१५ ऑगस्टला होणार ‘स्नेहसंवर्धन पुरस्कार’ वितरण; केरळकन्या सिंधुताई मानकरी

रयत समाचार वृत्तसेवा
53 / 100

आंबाजोगाई | प्रतिनिधी

अन्य राज्यातून येऊन आंबाजोगाईत स्थायिक झालेल्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला आंतरभारती, आंबाजोगाईच्या वतीने स्नेहसंवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. वर्ष २०२४ चा ‘स्नेहसंवर्धन पुरस्कार’ केरळच्या कन्या सिंधू किणिकर-नवगिरे यांना ता. १५ ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे. मागील वर्षीचे सत्कारव्यक्ती नरपती कुंजेडा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाईल.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब व आंतरभारती लातूरचे अध्यक्ष डॉ.बी.आर. पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

अन्य प्रांतीयांचे स्नेहमीलन

स्नेहसंवर्धन पुरस्काराच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी आंबाजोगाईत राहणाऱ्या अन्य प्रांतीयांचे स्नेहमीलन होणार आहे. अन्य प्रांतीय बंधू-भगिनी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन शरद लंगे (संयोजक), दत्ता वालेकर (अध्यक्ष), वैजनाथ शेंगुळे (सचिव) तथा कार्यकारिणी व आंतरभारतीच्या आजीव सदस्यांनी केले आहे.

हा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी, सायंकाळी ५ वाजता विलासराव देशमुख सभागृह, न.प. इमारत, आंबाजोगाई येथे होणार आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी आंतरभारती, आंबाजोगाईची टीम प्रयत्नशील आहे.

VIRAJ TRAVELS
Ad image
Share This Article
Leave a comment