अहमदनगर | दिपक शिरसाठ
पुणे येथील बार्टी व निटकॉन ट्रेनिंग सेन्टरच्या वतीने अनुसूचित जातीमधील युवक, युवती, महिलांसाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थींना रक्कम रूपये ४ हजार विद्यावेतन प्रति महिना देण्यात येणार आहे, अशी माहिती बार्टीच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रशिक्षणाचे नाव मोबाईल रिपेअर, इलेक्ट्रेशियन असे असून त्यासाठी शैक्षणिक पात्रता १० वी. पास आहे. तर उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. प्रशिक्षणासाठी आधारकार्ड,
पॅनकार्ड, मार्कशिट, जातीचा दाखला (SC), बँके पासबुक झेरॉक्स व ३ फोटो प्रति आवश्यक आहेत. सर्व कागदपत्रांची २ झेरॉक्स प्रती पाहिजेत. या प्रशिक्षणाचा कालावधी ४ महिन्यांचा आहे.
अधिक माहितीसाठी सिराज – 8855002100 आणि रियाज – 8329030430 यांना आरके कॅन्टीन, केअर हॉस्पिटल शेजारी, सावेडीनाका, सावेडी, अहमदनगर येथे सकाळी. १० ते ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा. प्रशिक्षणासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत याची नोंद घ्यावी.