Crime: फरार आरोपी सुवेंद्र गांधीचे फेसबुक अकाऊंट एक्टिव्ह; गुरुपौर्णिमेच्या दिल्या शुभेच्छा; डिजीटल युगात पोलिसांची डोळेझाक ? - Rayat Samachar

Crime: फरार आरोपी सुवेंद्र गांधीचे फेसबुक अकाऊंट एक्टिव्ह; गुरुपौर्णिमेच्या दिल्या शुभेच्छा; डिजीटल युगात पोलिसांची डोळेझाक ?

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
24 / 100

अहमदनगर | भैरवनाथ वाकळे

वैभवशाली नगर अर्बन बँक २९१ कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेच्या Crime घोटाळ्याचा शिल्पकार दिवंगत दिलीप गांधीपुत्र, चिल्लर घोटाळा, सस्पेन्स घोटाळ्याचा प्रमुख सुत्रधार तथा Rss भाजपाचा राज्य कार्यकारिणी सदस्य असलेल्या सुवेंद्र गांधीचे Faceboo अकाऊंट सक्रिय असून आजच सकाळी ११ तासांपुर्वी त्याने समस्त गुरूशिष्यांना पोस्ट करून शुभेच्छा मेसेज केलेल्या आहेत. त्यात त्याने इंग्रजी, हिंदीसोबतच काहीतरी संस्कृत मंत्र लिहलेला आहे. या पोस्टवर त्याच्या आवडत्या १३ इसमांनी Like सुध्दा केलेले आहे.
यापुर्वी त्याने ४ दिवसांपुर्वी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिलेल्या दिसून येत आहेत. त्यात त्याने म्हटले आहे की, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रूख्मिणी चरणी साष्टांग दंडवत…! आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!
#AshadiEkadashi #VitthalBhagwan #Pandharpur

फरार आरोपीची हि पोस्टही २९ लाडक्या इसमांनी लाईक, चौघांनी कॉमेंट तर एकाने शेअर केलेली दिसून येत आहे. यापुर्वी ५ जुलै व त्या पुर्वीच्या पोस्ट दिसत आहेत. याचा अर्थ आरोपीचे अकाऊंट सक्रीय आहे.

आपल्या Maharashtra Police यांचा जगात नावलौकीक आहे. Scotland Yard पोलिसांएवढेच चपळ व चाणाक्ष असलेल्या पोलिस भावांच्या डोळ्यातून ही फेसबुक सक्रीयता कशी काय निसटली आहे? सध्या Digital युगात राज्याचे पोलिसदल शार्प झाले असतानाही अंदाजे ३५० कोटी रूपये घोटाळ्यातील आरोपी कसाकाय चकमा देवून फरार राहू शकतो? याचे अन्यायग्रस्त अर्बन बँक ठेवीदार, सभासद व हितचिंतक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

डिजीटल युगातील पोलिसांची डोळेझाक गुन्हेगाराला पाठीशी घालणारी असून ‘सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याशी द्रोह करणारी असल्याची चर्चा ज्येष्ठ नागरिक, असहाय आणि आजारी पिडीत महिला भगिनी करत आहेत. या फेसबुक सक्रीयतेतून फरार आरोपी सुवेंद्र गांधी तात्काळ अटक व्हायला पाहिजे हेच पोलिसांची विश्वासार्हता आणि यश असेल, असा आशावाद अन्यायग्रस्त ठेवीदारांनी व्यक्त केला आहे.

हे हि वाचा :

Share This Article
Leave a comment