Biodiversity: समाजवादी विचारवंत प्रा.मा.रा.लामखडे अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सह्याद्री देवराईत ७५ झाडांचे रोपण - Rayat Samachar

Biodiversity: समाजवादी विचारवंत प्रा.मा.रा.लामखडे अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सह्याद्री देवराईत ७५ झाडांचे रोपण

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
15 / 100

संगमनेर | रजत अवसक

महाराष्ट्राची माय माऊली सानेगुरुजी शतकोत्तर महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर अनेकविध उपक्रम सुरू आहेत. सानेगुरुजींच्या विचारधारेवर महाराष्ट्राच्या अनेक धडपडणाऱ्या पिढ्या घडल्या. समाजवादी विचारवंत प्रा. मारुती रामचंद्र लामखडे हे या पिढीचे कृतिशील साथी यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभाच्या निमित्ताने संगमनेरमध्ये पुरोगामी पक्ष, संघटना, समाजवादी मित्र साथी परिवार, साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान, साथी भास्करराव दुर्वे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांचे वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचा भाग म्हणून समाजशिक्षक निसर्गप्रेमी, सच्चे समाजवादी साथी, प्रा.मा.रा.लामखडे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त या स्मृती चिरंतर रहाव्यात याहेतूने ७५ वृक्षांचे रोपण सायखिंडी येथील सह्याद्री देवराई परिसरात करण्यात आले. वृक्षारोपणाच्या जागेचे ‘समाजवादी साथी वन’ असे नामकरण करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक वृक्षाला महाराष्ट्र,  देशभरातील व अहमदनगर जिल्ह्यातील दिवंगत कार्यकर्त्यांचे नाव देण्यात आले. ज्या संगोपनकर्त्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले त्या कार्यकर्त्यांचे नावही त्या-त्या झाडांसह पाटीवर देण्यात आले, जेणेकरून वर्षभर त्या झाडाची निगा करणे हे त्या कार्यकर्त्याची जबाबदारी राहील, ते त्याचे संगोपन करतील. रिमझिम पावसामध्ये सह्याद्री देवराईचा हिरवागार परिसर पक्षांची किलबिल आणि सर्व परिसरामध्ये उत्साही वातावरणामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी परिक्रमा केली.

देवराईचे संचालक सिताराम राऊत यांनी सर्वांचे स्वागत केले. देवराई उभी करण्यामागील भूमिका व कल्पना त्याचसोबत वृक्ष लागवडीमागील धारणा आलेल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितली. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमापूर्वी दुर्वे ट्रस्ट्चे विश्वस्त राजा अवसक यांनी कृतिशील विचारवंत सानेगुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी असणारे धडपडणारे व्यक्तिमत्त्व व विद्यार्थीप्रिय शिक्षक प्रा.मा.रा.लामखडे यांच्या कॉलेज जीवनातील त्यांच्या उपक्रमशील कार्याचा आढावा घेतला. गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने एका समाजशिक्षक असलेल्या प्रा.मा.रा.लामखडे सरांचा गौरव करण्याची संधी सर्वांना उपलब्ध करून दिली, याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी दोन्ही संस्थांचे व कार्यक्रमाबाबत कृतिशी तेचे समाधान व्यक्त केले. ता.२७ जुलै अमृतमहोत्सवी कार्यक्रमाची रूपरेषा व्यक्त करून सविस्तर चर्चा यावेळी झाली.

यावेळी समाजवादी साथी राजाभाऊ अवसक, सिताराम राऊत, हिरालाल पगडाल, श्रीनिवास पगडाल, सूर्यकांत शिंदे, शशिकांत कंकरेज, नम्रता पवार, ॲड. ज्योती मालपाणी, हनुमंत उबाळे, अनिकेत घुले, बजरंग जेडगुले, संजय जेडगुले, बाळासाहेब पिंगळे, समीर लामखडे, प्रज्ञा लामखडे, डॉ.जी.पी.शेख, जुबेर इनामदार, प्रकाश पारखे, दिपक पावसे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बाळासाहेब जेडगुले, रजत अवसक, वेदांत राऊत यांनी पूर्वतयारीसाठी काम पाहिले.

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Share This Article
Leave a comment