सत्ताकारण | तुषार सोनवणे
एका खाजगी वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेत महाराष्ट्रात सत्तांतर होण्याचे भाकीत केले आहे. राज्यात महायुतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात लोकसभेप्रमाणे याही वेळी उद्धव ठाकरेच वरचढ ठरण्याची शक्यता सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आली आहे तर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शरद पवारांचे पारडे जड असणार आहे. इतर पक्षांना व अपक्षांना सर्व्हेत एकही जागा दाखवण्यात आली नाही, हे विशेष.
महाराष्ट्रात महायुतीला १३६ तर महाविकास आघाडीला १५२ जागांचा या सर्व्हेचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री कोण? सर्व्हेत विचारलेल्या या प्रश्नाला जनतेने दोन्ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांना समान संधी असल्याचे सांगितले.