ज्येष्ठ नागरिकांनी 'मुख्यमंत्री वयोश्री योजने'चा लाभ घ्यावा - राधाकिसन देवढे; सहायक समाजकल्याण आयुक्तांचे आवाहन - Rayat Samachar
Ad image

ज्येष्ठ नागरिकांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घ्यावा – राधाकिसन देवढे; सहायक समाजकल्याण आयुक्तांचे आवाहन

अहमदनगर | पंकज गुंदेचा

जिल्हयातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधणे, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधीत ठेवण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे.
या योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना असून योजनेची स्वरुप म्हणजे योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारिरीक असमर्थता, दुर्बलतेनुसार साहाय्यभुत साधणे, उपकरणे खरेदी करता येतील. चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॅड, स्टीक, व्हीलचेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर आदी करीता या योजनेअंतर्गत रुपये ३०००/- अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

अहमदनगर जिल्हयातील ६५ वर्ष पुर्ण असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, मतदानकार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र, जातीचे प्रमाणपत्र, ३१/१२/२०२३ अखेरपर्यंत वयाची ६५ वर्षे पुर्ण असणे आवश्यक. लाभार्थ्यांच्या घरातील उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र. या व्यक्तीने मागील ३ वर्षात सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्त्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. याबाबत लाभार्थी घोषणापत्र आवश्यक आहे.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, सावेडीनाका, अहमदनगर याठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment