दीक्षाभूमीची जागा बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी - डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर - Rayat Samachar
Ad image

दीक्षाभूमीची जागा बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी – डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर

छायाचित्र - सिध्दांत पाटील

नागपूर | प्रबुध्द भारत

दीक्षाभूमीची जागा शासकीय आदेशानुसार भारतीय बौध्द महासभाच्या ताब्यात द्यावी ही मागणी व त्यासंदर्भातील दस्तावेज नागपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर यांनी दिली. ते नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रवी भवन येथे माध्यमांशी संवाद साधला.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

मागील अनेक दिवसांपासून दीक्षाभूमीवरील होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधात आंबेडकरी जनता आंदोलने, निवेदने आणि मोर्चे काढत होते. मात्र याची प्रशासनाने दखल न घेता कामकाज सुरूच ठेवले होते, मात्र सोमवारी ता. १ रोजी आंबेडकरी जनता आक्रमक झाली आणि त्यांनी कामकाज बंद केले. याची दखल घेत शासनाने या कामकाजावर स्थगिती आणली. याच पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी नागपूर येथे भेट दिली आहे, अशी माहिती प्रबुध्द भारत यांनी दिली.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment