नारायणगाव | प्रतिनिधी |२९
शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. त्यांनी निर्णयाची प्रत प्रसिद्धीला देत म्हटले आहे की, केंद्र सरकारचा हा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे.
ते पुढे म्हणाले, मिनरल वॉटरची बाटली २० रुपये लिटर आणि दूध मात्र २४-२५ रुपये लिटर अशी दूध उत्पादक शेतकऱ्यांची कुचेष्टा सुरू असताना केंद्रातील NDA सरकारने दूधपावडर अत्यल्प शुल्क लावून आयात करण्याच्या निर्णय घेतल्याने दूध उत्पादक शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. अतिरिक्त दूध उत्पादन होत असताना सक्षम निर्यात धोरण आणणे अपेक्षित असताना आयातीचा घाट घालणाऱ्या शेतकरीविरोधी NDA सरकारच्या निर्णयाचा आम्ही निषेध करत आहोत.