इतिहास अभ्यासक देविकाराणी पाटील यांचा 'शाहू सामाजिक पुरस्काराने' सन्मान - Rayat Samachar
Ad image

इतिहास अभ्यासक देविकाराणी पाटील यांचा ‘शाहू सामाजिक पुरस्काराने’ सन्मान

पुणे | प्रतिनिधी |२५.६.२०२४

‘आरक्षणाचे जनक’ राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर महाराष्ट्र व देशभर अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विषयी संशोधन व लेखन यासाठी प्रसिद्ध इतिहास अभ्यासक देविकाराणी पाटील यांना पुणे येथील ‘राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘शाहू सामाजिक पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
ता. २३ जून रोजी पुणे येथे आगळ्यावेगळ्या स्वरूपात संपन्न झालेल्या समारंभात आमदार रविंद्र धंगेकर यांचे हस्ते तर दीपकभाऊ मानकर यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास वडघुले, सचिव प्रशांत धुमाळ, मार्गदर्शक विकास पासलकर, कार्याध्यक्ष मारुतीराव सातपुते, सदस्य विराज तावरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी कार्यक्रमासाठी मोठे कष्ट घेतले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment