नागपुर (गुरुदत्त वाकदेकर) २२.६.२०२४
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, सावनेर नगरपालिका कार्यालयात मुख्याधिकारी किरण बगडे, प्रशासन अधिकारी गजानन पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी न.प. प्राथमिक व न.प. हायस्कूल सावनेर येथील मुख्याध्यापकांची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल (आर एस पी) आणि नागरी संरक्षण दल (सिव्हिल डिफेन्स) नागपूरचे उपाध्यक्ष पितांबर एस. महाजन, विशेष शिक्षक यांनी केले. त्याचबरोबर कार्यक्रमाची सूरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली.
पितांबर एस. महाजन यांनी राष्ट्रीय योग दिनानिमित्त सूक्ष्म व्यायाम, योगासन, प्राणायाम, मेडीटेशन क्रिया आणि शरीर रिलॅक्ससेशन इ. योग क्रिया सर्वांकडून करून योगाभ्यासाचे महत्व पटवून दिले. शरीर आणि मनाचे आरोग्य सुधारून शरीर निरोगी कसे राखता याबाबात सविस्तर माहिती तसेच प्रात्यक्षिक करून दाखवली.
राष्ट्रीय योग दिवस निमित्तांने पंचायत समिती कार्यालय सावनेर येथील सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी बंधू भगिनी, सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू भगिनी,कर्मचारी वृंद यांनी उपस्थित राहून योगदिवस यशस्वी करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य करून योगाभ्यास विषयी आपल्याला आलेला अनुभव व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सावनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती बगडे, आपल्या जीवनात योगामुळे किती आनंद येऊ शकतो, आपण कायम निरोगी आयुष्य जगण्यासाठी नियमित योगा करणे काळाची गरज आहे असे सांगितले. तसेच योग दिवस यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले म्हणून सर्व उपस्थितांचे अभिनंदन आणि कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहशिक्षक चाचेरकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व आयोजकांनी विशेष मेहनत घेतली.
yyvv1o