नंदुरबार : शहादा : (गुरुदत्त वाकदेकर) २०.६.२४
श्री संतसेना नाभिक शिक्षण समितीच्या विद्यमाने शैक्षणिक साहित्य आणि शिष्यवृती वितरण आणि सेवापूर्ती समारंभ नुकताच श्री संतसेना समाज भुवन रामदेव बाबा नगर शहादा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिक समाजाचे अध्यक्ष उद्धव जांभळे आणि शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मकरंद पाटील, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी, शहादा तालुक्यातील प्रसिद्ध आरोग्य सेवक डॉ. किशोर आमोदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संतसेना महाराज प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नाभिक समाजातील मातृछत्र तसेच पितृछत्र हरपलेल्या मूला-मुलींना श्री संतसेना शिष्यवृतीचे वितरण शहादा व तळोदा मतदार संघातील लोकप्रिय आमदार राजेश पाडवी व शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात गुजर नाभिक समाजाचे कार्य व समाज संघटन कौशल्य खूप कौतुकास्पद आहे, असे शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मकरंद पाटील यांनी गौरवोद्गार काढले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख मनिलाल रतिलाल शिंपी यांनी समाजाच्या विविध उपक्रम व कार्यपद्धती विषयी बोलताना सांगितले की, गुजर नाभिक समाजामध्ये न्यायदानात समाज न्याय मंडळ व पंचायत यांचे कार्य खरोखर स्तुत्य आहे, गुजर नाभिक समाजाचे कोणतेही भांडण कोर्टात दाखल करण्यात येत नाही, शिस्तबद्धता, शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात आपसामध्ये सगळे तंटे सोडवले जातात. नाभिक समाजाच्या न्यायदानाचा हा आदर्श सर्वांनी घ्यावा.
परिवर्धे येथील गोरगरिबांचे कैवारी डॉ. किशोर आमोदकर यांनीही समाजाच्या विविध उपक्रमाबाबत कौतुक केले व अशा उपक्रमांसाठी माझी कायमस्वरूपी मदत राहील असेही त्यांनी आश्वासन दिले. यानंतर समाजातील गरीब, हुशार, गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वितरण डॉ. किशोर आमोदकर, डॉ. स्वप्निल महाजन, भास्कर देवरे, प्रा. रवींद्र जाधव, छोटूलाल जाधव या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
समाजातील मातृछत्र व पितृछत्र हरपलेल्या एका मुलास व एका मुलीस सायकलचे वितरण मकरंद पाटील, विनोद जैन, डॉ. मणिलाल शिंपी या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले,
समाजातील शासकीय आणि निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेले समाजबांधव सतीश नांदेडकर, प्रभाकर सोलंकी आणि अंबालाल सोनवणे यांचा सत्कार आणि सन्मान धर्मेश कुवर, मकरंद पाटील आणि भास्कर देवरे या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला, या कार्यक्रमात संदीप रघुवंशी, संजय जांभळे, अंबालाल पवार, ज्ञानेश्वर जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात समाजाचे आजी- माजी पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य, विभागीय अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य, विविध संस्थेचे व मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व संचालक वर्ग अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते समाज बंधू भगिनी, पालक वर्ग व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाषजी सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण समितीचे सचिव अशोक जाधव, उपाध्यक्षा सुचिता पवार व संचालिका उज्वला जांभळे यांनी केले शिक्षण समितीचे सचिव अशोकजी जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण समितीचे उपाध्यक्ष अजितेम सोनवणे, कोशाध्यक्ष हरीशजी सोलंकी, सहसचिव रमनजी सोनवणे, संचालक प्रा. डॉ. उद्धवजी जाधव, परीवर्धे येथील समाजसेवक किशोर जाधव, प्रदीप जाधव, सुदाम मदन जाधव, भिलुभाई रतिलाल जांभळे, रवींद्र विठ्ठल सूर्यवंशी, भरत देविदास पवार, सुनील बन्सीलाल सूर्यवंशी, किरण मोहन साळुंखे, ज्ञानेश्वर काशिनाथ सोलंकी, अमृत नारायण सोनवणे, जयेश रवींद्र सोनवणे, उज्वला संजय जांभळे, रवींद्र दगडू जाधव, विजय हरीश परमाळकर, पुरुषोत्तम जगन्नाथ कन्हैया, दिनेश काशीनाथ जाधव, महेश तुंबा सोलंकी, रविंद्र सखाराम होळकर, योगेश एकनाथ सोनवणे, मयुर अजय बोरदेकर, प्रशांत किशोर होळकर, अनिता मनोहर जाधव, आरती भूषण नांदेडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.