महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचा मोफत ऑफिस मॅनेजमेंट अँड एम्पलोयबिलीटी प्रोग्राम; शिक्षण संस्थांनी संपर्क साधण्याचे संचालक राहुल बांगर यांचे आवाहन - Rayat Samachar

महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचा मोफत ऑफिस मॅनेजमेंट अँड एम्पलोयबिलीटी प्रोग्राम; शिक्षण संस्थांनी संपर्क साधण्याचे संचालक राहुल बांगर यांचे आवाहन

रयत समाचार वृत्तसेवा

अहमदनगर (प्रतिनिधी) १९.६.२०२४

येथील महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाऊंडेशन या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी शासनस्तरावर प्रशिक्षण आणि प्रबोधन कार्यक्रम राबवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणाऱ्या संस्थेने ऑफिस मॅनेजमेंट अँड एम्प्लॉयबिलिटी कोर्स सुरु केला आहे. या कोर्समुळे शिक्षण सुरु असतांना किंवा पूर्ण करून जॉब शोधणाऱ्या युवकांना रोजगार मिळण्यासाठी मदत होणार आहे. हा कोर्स शहरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शिक्षण संस्थांमध्ये मोफत सुरु करायचा असल्याचा मानस संचालक राहुल बांगर यांनी व्यक्त केला आहे.
त्यासाठी संबंधित संस्था तसेच युवक युवतींनी ९०१११७३७०० या फोनवर संपर्क साधावा किंवा [email protected] या मेलवर प्रस्ताव पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आपला शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करून युवक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. नोकरीसाठी लागणारी पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका किंवा एखादा कोर्स पूर्ण करतात. नोकरीसाठी बायोडाटा तयार करतात. विविध कार्यालये, कंपन्या, आस्थापना यांच्याकडे रिझ्युम देऊन येतात. लिंक्ड इन, नोकरी डॉट कॉम यावर प्रोफाइल उपलोड करतात. मेलद्वारे संपर्क करतात. अशा इच्छुक उमेदवारांना नोकरीसाठी मुलाखत देण्याचा कॉल येतो. पण त्यासाठी दिलेल्या चाचणी परीक्षेत आणि मुलाखतीत ते रीजेक्ट होतात. कारण ते ज्या जॉबसाठी अप्लाय करतात त्यांना त्यासाठी लागणारे सॉफ्ट स्किल्स त्याच्याकडे नसतात. म्हणजे त्याला संगणकज्ञान नसणे, इंग्रजीत संभाषण कौशल्य, सभाधीटपणा, समस्या सोडविण्याचे कौशल्य, सहकाऱ्यांशी जुळवून घेण्याचे कसब त्याच्याकडे नसते, मुळात कामाचा अनुभव नसतो त्यामुळे त्यांना जॉब मिळत नाही.
यावर उपाय महास्किल फाउंडेशनने शोधून काढला आहे. या संस्थेने नागपूरच्या एज्युनेट या संस्थेशी करार करून अहमदनगरमधील तरुणांना मोफत ऑफिस मॅनेजमेंट अँड एम्पलोयबिलीटी प्रोग्राम देण्यास या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात केलेली आहे
ओबीसी/वी.जे.एन.टी./एस.बी.सी. प्रवर्गातील किमान बारावी उत्तीर्ण असणाऱ्या कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला या कोर्ससाठी त्याच कॉलेजच्या प्रशासनाला विनंती करून हा मोफत कोर्स जॉईन करता येईल. तसेच कॉलेज देखील स्वयंप्रेरणेने संस्थेशी जोडून विद्यार्थी हितार्थ हा कोर्स सुरु करू शकते.
मॅनेजमेंट अँड एंटरप्रिनरशिप अँड प्रोफेशनल स्किल कौंसिल अर्थात एमईपीएससी या संस्थेने पुढाकार घेऊन या कोर्सचा अभ्यासक्रम सेट केला आहे. नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना रोजगार कौशल्य सहज आत्मसात करता यावेत यासाठी दहा घटकांमध्ये अध्ययन साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामध्ये संगणकाच्या सहाय्याने ऑफिस रुटीन सांभाळणे, मुलभूत इंग्रजी कौशल्य, करिअर डेवलपमेंट ध्येय निश्चिती, संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याचे कौशल्य, कार्यलयीन सहकार्यांचे नियोजन, आर्थिक साक्षरता, मुलभूत डिजिटल कौशल्य, ग्राहक सेवा आणि मुलाखतीचे तंत्र इत्यादी युवकांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या घटकांचा अंतर्भाव आहे. तसेच हा एम्पलोयबिलीटी प्रोग्राम विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्याच महाविद्यालयात उपलब्ध होणार असून दोन महिन्याच्या कोर्स कालावधीसाठी तज्ञ मार्गदर्शक देखील उपलब्ध असणार आहेत. MEPSC, NSDC आणि महाज्योती या शासन संस्थाचे सर्टिफिकेशन शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
मागील शैक्षणिक वर्षात एजुनेट संस्था, नागपूर मार्फत २० हजारपेक्षा जास्त युवकांना या एम्पलोयबिलीटी प्रोग्रामचा मोफत लाभ झाला आहे. इजूनेट संस्थेच्या सहकार्याने हा प्रोग्राम आपल्या शहरात सुरू होणार असल्याचे राहुल बांगर यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment