राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड - Rayat Samachar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड

रयत समाचार वृत्तसेवा

मुंबई (प्रतिनिधी) १८.६.२०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी केली आहे.
राज्यसभा सदस्य प्रफुल्ल मनोहर पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी (महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या) ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी श्रीमती पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

Share This Article
Leave a comment