पंढरपूर (प्रतिनिधी) १६.६.२०२४
राजर्षी शाहू महाराज १५० वा जयंती उत्सव ता. २६ जून २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त प्रतिमा पुजन, मान्यवरांचे व्याख्यान आदी कार्यक्रमासह अन्य उपक्रम आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती अमरजीत पाटील यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, उत्सवासाठी प्रत्येकी ₹ ५००/- आपले सामाजिक उत्तरदायित्व म्हणून निधी जमा करण्याचे ठरलेले आहे. वर्गणी खालील क्युआर कोडवर पाठवावी. आपण आपला सामाजिक उत्तरदायित्व निधी सोबतच्या क्युआर कोड द्वारे जमा करावा. जयंती उत्सवानंतर हिशोब सर्वांना पाठवला जाईल.
पुढिल बैठक रविवारी ता. २३ जून २०२४ रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पंढरपूर येथे सकाळी ठिक ११ वाजता होणार आहे. असे फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष अमरजीत पाटील यांनी सांगितले.